नियंत्रित वातावरणातील शेती व त्याचे महत्व
नियंत्रित वातावरणातील शेती संबंधात चर्चा करताना हरितगृह (ग्रीनहाउस), काचेचे गृह (ग्लास हाऊस), पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, नेट हाऊस यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तसेच नियंत्रित वातावरणात शेती करणे म्हणजे यापैकी कुठल्यातरी गृहात पीक घेणे किंवा शेती करणे असा अर्थ होतो. वर उल्लेखलेल्या गृहाद्वारे पिंकाला पोषक असे किंवा त्याच्या जवळपास वातावरणाची निर्मिती करून पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेत भरीव वाद्ध करता पेंतें. वर्षभर वेगवेगळ्या हंगामात पिकांना हवे तसे वातावरण मिळू शकत नाही.
मात्र बाजारपेठेतील मागणीनुसार वर्षभर फळे, भाजीपाला व फुले यांचे उत्पादन घेणे शेतक-यांस फायदेशीर ठरतं. त्यासाठी अर्थातच वातावरणातील घटक पिकांच्या गरजेप्रमाणे नियंत्रित करणे महत्वाचे आहे. 'ग्रीनहाऊस इफेक्ट' या संकल्पनेचा उपयोग थंड हवेच्या देशात हरितगृहामधील तापमान वाढविण्यासाठी केला गेला पण आपल्याकडे तपमान कमी करणे तसेच वातावरणातील इतर घटकांचे नियंत्रण करण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहाचा वापर करणे शक्य झाले आहे. हरितगृहामध्ये वातावरणातील तापमान, आर्दता, प्रकाश वेगवेगळे तंत्र वापरून नियंत्रिंत (कमीं किंवा जास्त) केले जातें तर्सेच कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण ही राखता येते.
शेड्नेंटगृहामध्ये मुख्यतः वातावरणातील तापमान कमी केले जाते तसेच आर्दता, वारा यांचे ही नियंत्रण करता येते. शेंडनेटगृहू व हरितगृह यांचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व फुलपिकांसाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून उपयुक्त अशी वातावरणनिर्मिती करून चांगल्या प्रतीचे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी करता येतो. पिंकांच्या उत्पादनवाढीचा कालावधी कमी-अधिक करण्यासाठी नियंत्रित वातावरणाच्या हरितगृहाचा उपयोग होतो. तर आपण फक्त 'हरितगृह प्रभावाचा' वापर करून तपमान वाढविण्यासाठीच हरितगृहाचा वापर न करता हवामानाच्या इतर घटकांवर सुध्दा कमी-अधिक प्रमाणात पिकांच्या आवश्यकर्ते प्रमाणे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतो.
ब-याच वेळेला शेतक-यांना प्रश्न पडतो की हरितगृह किंवा पॉलीहाऊस करावें की शैड़नेटहाऊस? क्यासाठीं आपल्याला आधीं दोन्हींमधील फरक समजून घ्यावा लागेल. सर्वात प्रथम हे समजून घ्यावे की शेडनेट हाउस हे पावसाळ्यात पिकांना पावसापासून संरक्षण देऊ शकत नसल्याने यामध्ये आपण आठ महिनेच शेती करु शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा अतिशय कमी पावसाच्या ठिकाणी आपण १२ महिने यामध्ये किंफायती शेती करु शकतो. शेड्नेटहाऊसला पॉलिहाऊसच्या तुलनेत १/३ पर्यंत कमी खर्च पेंतों. वरील बाबी लक्षात घेतल्यावर निर्णय घेताना आर्थिक निकष पाहूनच घ्यावा. उदा. कुठले पीक घेत आहोत व त्याला बाजारभाव किंती मिळणार आहे व मिळालेला नफा केलेल्या अधिक खर्चाच्या तुलनेत अधिक आहे का ? हाच विचार किंबहुना गोल छताच्या किंवा सपाट छताच्या शेडनेट हाऊससाठी व नियंत्रित पॉलीहाऊस'साठी देखील करावा.
संरक्षित शेतीमध्ये सर्वात कमी खर्चात आपण शेतीच्या चारही बाजूने (Insect Net) व (UV Film Geomembrane Fabric) चे कनात/पडदे लावून देखील चांगला लाभ मिळवू शकतो. यामुळे आपल्याला बाहेरील रोग/किड यांचा प्रादुर्भाव रोखण्यात किंवा कमी करण्यास मदत मिळते तसेच जोरदार वा-यापासून देखील चांगले संरक्षण मिळते. याचबरोबर रात्रींचे कार्बन डायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी देखील याचा फायदा मिळू शकतों
नेियंत्रित वातावरणातील शेतीचे फायदे
पिंकाच्या आवश्यकतेप्रमाणे वातावरण निर्मिती केल्यामुळे हरितगृहू/ शेडनेटगृहाचे अनेक मुख्य व पूक फायदे खालीलप्रमाणे आहेत.
- पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करता येऊ शकते
- पिकाचे उत्पादन/ उत्पादकता व गुणवत्ता यांच्यात लक्षणीय सुधारणा होते व चांगल्या गुणवत्तेमुळे बाजारभाव चांगला मिळतो.
- बाजारपेठेतील मागणीप्रमाणे योग्य तें नियोजन करून वर्षभर फळभाजी व फुले यांचा पुरवठा करता येऊ शकतो.
- नेिविष्ठांच्या वापरावरही नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे कमीतकमी शेती नेिविष्ठांचा वापर करता येतो.
- पाणीवापरामध्ये लक्षणीय बचत होते.
- पीक संरक्षणामध्ये किंडी व रोगांच्या प्रादुर्भावास व लागणीस अटकाव होतो.
- उचदर्जाची फळे व भाजीपाला याबरोबरच वजन, रंग व स्वाद वाढल्यामुळे बाजारामध्ये वाढीव दर मिळतो.
- पिंकाचे अतेि व कमी तापमान, वारा, गारठा, बर्फ, पक्षी व कीटक यांच्यापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे पिकाचे पावसाळ्यात गारांपासून तसेच अतिवृष्टींपासून बचाव होण्यास मदत होतें.
- कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त होतें.
- रॉजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणावर सहाय्य होते. याचसोबत हरितगृहू/शेड्नेट्याहू यामध्ये शेती करण्याच्या काही मर्यादाही आहेत, हरितगृह/शैडनेटगृहाच्या उभारणीसाठी प्रारंभिक खर्च जास्त येतो. तसेच प्रत्यक्ष शेती करताना अधिक भांडवलामुळे शेतकरी या शेतीकडे वळत नसला तरी, कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने जास्त झालेला खर्च वसूल होऊ शकतो.
तसेच शासकीय अनुदानाचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. हरितगृह / शेडनेटगृह उभारणी तसेच त्यामध्ये शेती करण्याचे तंत्रज्ञान पारंपरिक शेतीप्रमाणे शेतक-यांना उपलब्ध नसल्याने प्रथमतः ही शेती करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु कृषि विद्यापीठे तसेच राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHM), तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षण सुविधांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. हरितगृह / शेडनेटगृहामधील रोग व कोड नियंत्रण जरी सुलभ असले तरी याकडे थोडेही दुर्लक्ष केले तर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण याकडे नियमित लक्ष ठेवल्यास यावर मात करता येते. हरितगृह / शेडनेटगृहाचा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो.
- फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे
- भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका तयार करणे
- उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे
- भाजीपाला पिकांच्या जाती व बीज उत्पादन घेणे.
- पिकांचे संशोधन व विकास करणे
- गारा, बर्फ इ. पासून संरक्षण करणे. हरितगृह / शेडनेटगृहामध्ये खालील पिकांचे व्यापारी तत्वावर उत्पादन घेता येते.
- फुलपिके : हरितगृहामध्ये प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले यासारख्या फुलांचा समावेश असतो.
- भाजीपाला : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळी इ. चे उत्पादन घेतले जाते.
- पालेभाज्या : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी इ. चे उत्पादन घेतले जाते.
- जास्त किंमतीचा भाजीपाला : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये ब्रोकोली, झुकेनि, लॅटयुस, लिक, पार्सेली इ. चे उत्पादन घेतले जाते.
- औषधी पिके : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये हळद, आले, चिवस, मीट, बसीगिल, इ.चे उत्पादन घेतले जाते.
- फळे : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये स्ट्रॉबेरी, टरबूज, डाळींब, द्राक्ष, केळी इ. चे उत्पादन घेतले जाते.
अधिक माहितीसाठी-
हरितगृह
शेडनेट हाऊस
मल्चिंग
No comments:
Post a Comment