shednet house

 

                     

                      शेडनेटगृह

शेडनेटगृह हे सांगाडा म्हणजे फ्रेम असलेले घर असून ते जी. आय पाईप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकाच्या प्लॅस्टीकच्या जाळीने (शेडनेटस) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यु.व्ही. संस्कारीत अशा १oo टक्के पॉलीईथिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या असतात.

या शेडनेटच्या सहाय्याने दिवसा पिकांसाठी प्रकाशाची तीव्रता व प्रभावी उष्णता कमी करता येत असल्याने ब-याच अंशी वातावरणावर नियंत्रण करता येते. यामुळे हरितगृहाप्रमाणे शेडनेटगृहाचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व फुलपिकांसाठी उपयुक्त अशी वातावरण निर्मिती करून 'चांगल्या प्रती’ चे जास्त उत्पादन मिळविण्यासाठी करता येतो.

शेडनेटगृहात वातावरणातील तापमान, आर्द्रता, कर्बवायु, वारा इत्यादी घटकांवर ब-याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येत असल्याने शेडनेटगृहातील पीक लागवड ही उघड्या शेतातील पीक लागवडीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. ज्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त असते अशावेळेस पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त तापमानात तग धरणे कठीण होते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धताही कमी असते. कमी पाण्यात व अति तापमानात पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतात व उत्पादनात लक्षणीय घट आल्याने उत्पन्न कमी मिळते. अशास्थितीत पिकांना शेडनेटच्या सहाय्याने सावली केली तर वातावरणातील तापमान तर कमी होतेच शिवाय पिकांची पाण्याची गरज सुध्दा कमी होते व त्यामुळे पीक लागवड यशस्वी होते. पिकांसाठी शेडनेटगृहाचे क्षेत्र ५ गुंठ्यापासून १ एकरापर्यंत असू शकते.

शेडनेटगृहाचे प्रकार-

शेडनेटगृहाचे छताच्या आकारानुसार साधारणपणे खालीलप्रमाणे प्रकार आहेत .

अ) सपाट छताचे शेडनेटगृह (फ्लॅट रुफ) :

  1. कमी उंचीचे (३.२५ मी.),
  2. जास्त उंचीचे (४ मी.)

ब) गोलाकार छताचे शेडनेटगृह (डोमशेप रुफ) :

  1. कमी उंचीचे (४ मी.),
  2. जास्त उंचीचे (५ मी.)

शेडनेटगृहासाठी जागेची निवड-

शेडनेटगृह उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर जागेची निवड चुकली तर शेडनेटगृहातील पीक लागवड अपयशी ठरू शकते. त्यासाठी जागेची निवड करताना खालील बाबींचा अवलंब करणे आवश्यक असते.

  1. जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. निचरा होणारी जमीन नसेल तर शेडनेटगृहाभोवती चर अथवा दांड काढावा की यातून पाण्याचा निचरा होईल व शेडनेटगृहामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी पिकाच्या मुळांच्या खाली राहील.
  2. पाणथळ जागा शेडनेटगृहासाठी निवडू नये तसेच शेडनेटगृहाची जागा खोलगाट ठिकाणी नसावी.
  3. शेतात उंचसखल जमीन असल्यास किंवा जास्त उतार असल्यास जागेचे सपाटीकरण करणे गरजेचे असते.
  4. पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ दरम्यान व क्षारतेचे प्रमाण कमी असलेल्या जागा योग्य असतात.
  5. पाणी पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी. तसेच विद्युतपुरवठ्याची सुविधा असावी.
  6. इमारती, मोठे वृक्ष, इ. ची सावली शेडनेटगृहावर पडणार नाही, अशी जागा निवडावी.
  7. निवडलेल्या जागेत भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते.

शेडनेटगृहाची दिशा-

शेडनेटगृह उभारताना गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची दिशा दक्षिणोत्तर (दक्षिण- उत्तर) अशी ठेवावी. मात्र सपाट शेडनेटगृहासाठी कुठलीही दिशा ठेवली तरी चालते.

शेडनेटगृहाची उभारणी-

शेडनेटगृह उभारताना खालील बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक वरील घटकांचे / बाबींचे तांत्रिक निकष पुढे सविस्तर दिलेले आहेत.

शेडनेटगृहाचा पाया (फाउंडेशन)

शेडनेटगृहाच्या क्षेत्रानुसार जमिनीवर मोजमाप करुन टेलीस्कोपिक फाउंडेशनसाठी आरेखन करावे. ज्या ठिकाणी फाउंडेशन येणार असतील त्याठिकाणी २ फूट खोलीचा व १ x १ फूट मापाचा सरळ उभा खडुा घेऊन त्यामध्ये १o0 सें.मी. लांबीचा, १.२५ इंच व्यासाचा (कमी उंचीच्या शेडनेट हाउससाठी) / १.५0 इंच व्यासाचा (जास्त उंचीच्या शेडनेट हाउससाठी) व कमीत कमी २ मि.मी. जाडी असलेला जी.आय.पाईप उभा बसवून त्यास होल्डफास्टबार टाकून सिमेंट काँक्रीटच्या (सिमेंट : खडी : वाळू १:२:४ या प्रमाणात) सहाय्याने खडुा भरून घ्यावा. मात्र सपाट छताच्या शेडनेटगृहाच्या बाजूंच्या हॉकीसाठी o.४५ x 0.४५ × १.० मी आकाराचे खडे घ्यावेत. काँक्रीटमध्ये वापरावयाचे सिमेंट ५३ ग्रेडचे असावे. सिमेंट काँक्रीटचे फाउंडेशन जमिनीच्यावर १५ सें.मी. तरी असायला पाहिजे. फाउंडेशन चांगले पक्के व्हावे म्हणून त्यास तीन आठवडे रोज पाणी देणे गरजेचे असते.

शेडनेटगृहाचा सांगाडा (फ्रेम)

शेडनेटगृहाचे आयुष्यमान जास्तीतजास्त होण्यासाठी जी. आय. पाईपचा सांगाडा असणे आवश्यक आहे. या पाईपच्या भिंतीकेचा व्यास २' व जाडी बीएसआय नामांकनाप्रमाणे कमीत कमी २.९ मि.मी. असावी. वान्याच्या १२० कि.मी. प्रतितास या वेगास शेडनेटगृह टिकण्यासाठी शेडनेटगृहासाठी वापरण्यात येणा-या निरनिराळ्या व्यासाच्या पाईप्सची प्रमाणके खालीलप्रमाणे आहेत.

तक्ता क्र. २ : गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाच्या सांगाड्यासाठी

अ.क्र.पाईपचे नावपाईपचा व्यास (इंच)
कमी उंचीचे शेडनेट हाउसजास्त उंचीचे शेडनेट हाउस
मुख्य कॉलम१.५२.
वरील बेंड ट्रूस१.२५१.५
पर्लीन१.२५१.२५
ट्रूस मेंबर्स१.१.२५
ट्रूसचा बॉटम१.१.२५

तक्ता क्र. ३ : सपाट छत असलेल्या

अ.क्र.पाईपचे नावपाईपचा व्यास (इंच)
कमी उंचीचे शेडनेट हाउसजास्त उंचीचे शेडनेट हाउस
मुख्य कॉलम१.५2.०
बाजूंचे मधील पोल१.२५१.५
मुख्य कॅरीडोर(हॉकी )१.२५१.५
बाजूंची मधील हॉकी1.००१.२५
ट्रूस1.००१.२५
प्रलीन1.००१.२५

सपाट छत असलेल्या शेडनेटगृहाची उंची कमीतकमी ३.२५ मीटर (कमी उंचीच्या शेडनेटहाऊस) व ४.oo मीटर (जास्त उंचीच्या शेडनेटहाऊस) असावी, तर गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची मध्यभागी उंची कमीतकमी ४.oo मीटर (कमी उंचीच्या शेडनेटहाऊस) व ५.00 मीटर (जास्त उंचीच्या शेडनेटहाऊस) असावी.

सांगाड्यातील सांध्यांसाठी नटबोल्ट व क्लॅम्प्स

सांगाड्यातील जी. आय. पाईप्सची जोड़णी वेल्डिंगने करू नये. सांगाड़ा भकम व टिकाऊ होण्यासाठी त्यातील सांधे नटबोल्ट, एल आकाराचे अँगल्स व क्लॅम्प्सच्या सहाय्याने जोडावीत. नटबोल्ट, क्लॅम्प्स व एल अँगल्स हे 'झिंक प्लेटेड' व चांगल्या प्रतीचे असावेत.

शेडनेट

शेडनेटगृहास जी शेडनेट लावायची आहे ती यु.व्ही. स्टॅबीलॉईड असणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे शेडनेटची टक्केवारी लक्षात घेऊन तिची निवड करावी. शेडनेट १५ टक्के, ३५ टक्के, ४0 टक्के, ५o टक्के, ७५ टक्के व ९० टक्के या सावलीच्या टक्क्यांमध्ये उपलब्ध असतात. शेडनेट विविध रंगातही उपलब्ध आहेत जसे की हिरवा, पिवळा, काळा, पांढरा, लाल, काळा , निळा, निळा-पांढरा, हिरवा-पांढरा इत्यादी. '३५ टक्के शेडनेट' म्हणजे प्रकाशाची तीव्रता (लाइट इंटेसिटी ) ३५ टक्क्यांनी कमी होईल व फक्त ६५ टक्के प्रकाशाची तीव्रता शेडनेटमधून आत जाईल. प्रत्येक पिकाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची स्वत:ची विशिष्ट सूर्यप्रकाश व सावलीची अशी गरज असते. म्हणून आवश्यक ते हवामान निर्माण करण्यासाठी योग्य सावली गुणांकांची शेडनेट निवडल्याने पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते.

शेडनेट बसविणे

शेडनेटगृहाच्या सांगाड्यास शेडनेट बसविण्यासाठी अॅल्युमिनीयम प्रोफाइल्सचा उपयोग करतात. या प्रोफाइल्समध्ये ही शेडनेट स्प्रिंगचा वापर करून ताणून बसविली जाते. अॅल्युमिनिअम प्रोफाइल्स या कमीतकमी २२५ ग्रॅम / मीटर एवढ्या वजनाच्या असाव्यात. स्प्रिंग या स्टीलपासून बनविलेल्या असून त्या कमीतकमी २.५ मि.मी. जाडीच्या असाव्यात व त्यावर कमीतकमी ५o मायक्रॉनचे झिंक प्लेटिंग असावे.

शेडनेटगृहास जमिनीलगत सभोवती यु.व्ही.फिल्म लावणे (स्कॉटिंग)

बाहेरील वातावरणातील हवेत ३१० पी.पी.एम. इतका कर्बवायू असतो. हरितगृहामध्ये रात्रीच्या वेळेस वनस्पतींनी केलेल्या कर्बवायुच्या उत्सर्जनामुळे कर्बवायूच्या पातळीत १oo० ते १२०० पी.पी.एम. इतकी वाढ होते.

या कर्बवायूच्या पातळीत वाढ झाल्याने पिकांना त्यांच्या अन्न तयार करण्याच्या 'प्रकाश संश्लेषणा'च्या प्रक्रियेत ३ ते ४ पटींनी वाढ होते व त्यामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादन ४ ते ५ पटींनी वाढते. याच तत्त्वावर शेडनेटगृहास सभोवताली जमिनीलगत १ मी. उंचीइतके २०० मायक्रॉन जाडीचे यु.व्ही. फिल्म किंवा १५० जी.एस.एम. (ग्रॅम/चौ.मी.) चा जीओ फॅब्रिक लावल्याने (स्कटींग) पिकाच्या उत्पादनात व उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते. कर्बवायु हवेपेक्षा जड असल्याने तो जमिनीलगत साठून राहतो. शेडनेटगृहास स्कटॉँग केलेले नसल्यास हा कर्बवायु शेडनेटगृहात साठून शकल्याने त्यापासून फायदा होत नाही. म्हणून यु.व्ही.फिल्मचे स्कटॉँग करणे फायद्याचे आहे.

भविष्यातील संधी ; शेडनेटगृहू व हरितगृह उभारणीसाठी साधारणतः वेगवेगळ्या आकारानुसार रु. ३00 ते १५oo प्रति चौरस मीटर एवढा खर्च येतो . त्यामध्ये वातावरणातील विविध घटकांचे नियंत्रण करण्यासाठी लागणाऱ्या  प्रणालीवर (र्मिस्टींग, फॉंगींग, कार्बनडायऑक्साईड, प्रकाश इत्यादी) तसेच पिकाच्या लागवडीसाठी लागणा-या विविध प्रणालीवर (जमिनीचे माध्यम (सॉईल मिडीया), सिंचन प्रणाली, पिकाचे वजन पेलणा-या प्रणाली) येणा-या खर्चाचा अंतर्भाव नाही. या सर्व बाबींमुळे शेतक-यांना सुरवातीचा भांडवली खर्च जास्तीचा करावा लागतो. महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे व इतर कृषि विषयक संशोधन संस्थामध्ये घेतलेल्या प्रयोगाद्वारे व सध्या जे प्रगतशील शेतकरी हरितगृह व शेडनेटगृहामध्ये विविध पिकांचे (विशेषतः गुलाब, जरबेरा, कानॅशन, सिमला मिरची, काकडी) उत्पादन घेतात, त्यांना आलेल्या अनुभवाद्वारे सुरवातीला लागलेला भांडवली खर्च २ ते ३ वर्षात निघून येतो, असे दिसून आले. एकीकडे अनियंत्रित किंवा नैसर्गिक वातावरणात शेती करताना आलेल्या उत्पादनापेक्षा कित्येक पटीने (७ ते १o) नियंत्रित वातावरणात शेती तसेच एकीकडे वेगाने वाढणा-या मध्यमवर्गीय लोकसंख्येच्या वर्षभर चांगल्या गुणवत्तेच्या फुले व भाजीपाल्याच्या गरजा तर दुसरीकडे त्यासाठी लागणा-या जमीन व पाणी या मुख्य निविष्ठांचे उत्तरोत्तर होणारे दुर्भिक्ष या सर्वांमुळे शेतक-यांना तसेच हरितगृह व शेडनेट गृहाचा व विविध निविष्ठा पुरवठा करणा-यांना भविष्यात पुढीलप्रमाणे विविध संधी उपलब्ध आहेत.

  1. सुरवातीचा भांडवली खर्च कमी करणे व हरितगृहाची व शेडनेटगृहाची गुणवत्ता राखणे
  2. निविष्ठांचा इष्टतम वापर करून उत्पादकता वाढविणे
  3. उद्य गुणवत्तेच्या उत्पादनाचा वर्षभर पुरवठा करणे
  4. रोग व केिड नियंत्रण संदर्भात संशोधन करणे

नैसर्गिक आपत्तीच्या काळात नियंत्रित वातावरणात शेती करणे माती विना शेती (Soj|less Cultivation) या तत्वाड्र्द्वारे शेती करणे

संशोधनपर आधारित शिफारशी

काटेकोर शेती विकास केंद्र, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. येथे झालेल्या संशोधनावर आधारीत शिफारशींचा तपशील पुढे दिला आहे.

  1. हरितगृहात जरबेरा फुलझाडांपासून अधिक व दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळण्यासाठी लागवडीचे माध्यम लाल माती+शेणखत+वाळू+भाताचे तूस हे ३:३:३:१ या प्रमाणात वापरावे.
  2. हरितगृहात कानेंशन फुलझाडांच्या अधिक व दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी दर आठवड्याला विद्राव्य खतांद्वारे सुरुवातीच्या एक महिन्यापर्यंत ३.७o:१.३o:२.९० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश/चौ.मी. त्यानंतर पुढील दोन महिन्यांपर्यंत ३.७५:१.२०:४.५० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश/चौ.मी. आणि तद्रतर ३.९o:१.२o:५.६0 ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश/चौ.मी. प्रमाणे खतमात्रा द्यावी.
  3. हरितगृहात जरबेरा फुलझाडांपासून अधिक उत्पादन व आर्थिक फायदा मिळण्यासाठी ३ox३0 सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.
  4. मुक्त वायुसंचारित हरितगृहातील कानेंशन फुलांच्या गुणवत्तापूर्ण अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी कानेंशनची लागवड १५’×१५ सें.मी. अंतरावर करून त्यास दररोज बाष्पीभवनाच्या ६० टक्के पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे
  5. अर्ध-नियंत्रित हरितगृहात जरबेरा फुलांचे अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे दररोज बाष्पीभवनाच्या ६0 टक्के पाणी व प्रतेि आठवड्यास ३.४o : १.७१ : ४.११ ग्रॅम प्रति चौ.मी. प्रमाणे नत्र : स्फुरद : पालाश विद्राव्य खतांच्या मात्रेतून द्यावे.
  6. नैसर्गिक वायुसंचारित हरितगृहातील हिरव्या ढोबळी मिरचीच्या (ऑक्टोबर लागवड) चांगल्या प्रतीच्या अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ठिबक सिंचनातून पीक बाष्पपर्णात्सर्जनाच्या ७० टक्के पाणी प्रती दिन आणि शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के विद्राव्य खते (फुले येण्यापूर्वी: ८.o; २.८:४.0:२.८:0.२ कि.ग्रॅ. प्रती हेक्टर आणि फुले आल्यानंतर ६.0:३.0; १५.o:३.0:0.३ कि.ग्रॅ. प्रती हेक्टर नत्र : स्फुरद : पालाश : कॅल्शिअम : मॅग्रेशिअम) दिवसाआड ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत.
  7. चांगल्या प्रतीच्या ढोबळी मिरचीच्या (ऑक्टोबर लागवड) अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ७५ टक्के सावलीच्या शेडनेटगृहात लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे दररोज पीक बाष्पपर्णात्सर्जनाच्या ७५ टक्के पाणी द्यावे.
  8. काकडीच्या (उन्हाळी लागवड) अधिक उत्पादनासाठी ७५ टक्के सावली गुणांकाच्या शेडनेटगृहात लागवड आणि ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या (१oo : ५o : ५० कि.ग्रॅ./हे.) १२५ टक्के विद्राव्य खते २६ समान हप्त्यात ४ दिवसाच्या अंतराने लागवडीनंतर १५ दिवसाने द्यावीत. 

No comments:

Post a Comment