green house

हरितगृह


हरितगृहाचा (Green House) उपयोग प्रामुख्याने हंगामी बिगर हंगामी पिके घेण्यासाठी होतो. उच्च प्रतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी उती संवर्धना द्वारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे रोपवाटिका तयार करण्यासाठी हरितगृह उपयुक्त आहे.

हरितगृहाचा उपयोग संरक्षित वातावरणात शेती करण्यासाठी होतो. हरितगृहाची व्याख्या करायची झाली तर अशी करू शकतो- 'पारदर्शक एफ.आरपी किंवा काच यापासून तयार करण्यात येणा-या आवरणाने आच्छादित केलेल्या रचनेला हरितगृह असे म्हणता येईल.' ही आवरणे बाहेर जाण्यापासून रोखतात. त्यामुळे हरितगृहात पिकांच्या वाढीसाठी उत्तम वातावरण तयार होते.

हरितगृहाचे प्रकार

) वातावरण नियंत्रित हरितगृह
या प्रकारच्या हरितगृहामध्ये तापमान आर्द्रता विविध तंत्र वापरून नियंत्रित केली जाते.
फॉगर चा वापर पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे केला जातो. या प्रकारच्या हरितगृहासाठी वायुविजन पंखे, सेल्युलोजचे पडदे आवश्यक आहेत. फॅनपॅड सूक्ष्म सिंचनासाठी विजेची गरज असते. तसेच पडद्यावर पाणी पडण्यासाठी विद्युत पंप आणि नळ जोडणी असणे आवश्यक आहे
.

नैसर्गिक वायूविजन हरितगृह
या प्रकारचे हरितगृह नैसर्गिक वायूविजनावर आधारित असते. या आधारे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे तापमान, आर्द्रता, कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण राखता येते.

यामध्ये कीटक जिवाणूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्लास्टिकची जाळी म्हणजेच इन्सेक्ट नेट वापरण्यात येते. हरितगृहाच्या वायूविजनसाठी ठेवलेली उंचीवरील झडप ही उत्तर किंवा पूर्व दिशेस उघडणारी असावी. म्हणजे हरितगृहाचे तापमान कमी राखण्यास मदत होते. वायुविजन म्हणजे हरितगृहातील गरम हवा बाहेर काढणे हरितगृहातील तापमान, आर्द्रता, कार्बन वायू पिकाभोवतालची खेळती हवा नियंत्रित ठेवणे होय. हरितगृहाच्या वायुविजनसाठी एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्र थंड हवा आत येण्यासाठी आतील हवा बाहेर काढण्यासाठी उघडे ठेवण्याची सोय असावी.

हरितगृहातील तापमान नियंत्रणासाठी अतिसुक्ष्म फवारा संयंत्र, फाॅगींग सिस्टीम असणे आवश्यक आहे. पिकाच्या गरजेनुसार छताला ५० टक्के बाजूला ३५ टक्के पांढऱ्या रंगाची युव्ही स्टॅबिलाइज्ड शेडनेट असावी. 

हरितगृहासाठी जागेची निवड

काळी, निचरा न होणारी जमीन असेल तर दोन इंच जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाफे करावेत. हरितगृहाभोवती दीड फूट बाय दीड फूट आकाराचा चर काढावा. जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल. भरपूर सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी हरितगृहास मिळू शकेल अशी जागा निवडावी. शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे. पानथळ जागा हरितगृहासाठी वापरू नये. मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा निवडू नये. पाणीपुरवठ्याच्या सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे. पाण्याचा सामू ६ ते ७.५ या दरम्यान व क्षारतेचे प्रमाण जास्तीत जास्त ०.१ ते ०.५ मिली मोहोज प्रति सेंमी इतके असणे अपेक्षित आहे. विद्युत पुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे.

हरितगृहाच्या दिशा ठरविताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात?

वाढणाऱ्या पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा वाहणाऱ्या वाऱ्यापासून हरितगृहास धोका नसावा या दोन्ही बाबींचा विचार करून हरितगृहाची दिशा दक्षिण उत्तर ठेवावी त्यामुळे वरील झडप (व्हेन्ट) पूर्व - उत्तर दिशेस येईल.

हरितगृह उभारणीसाठी लक्षात ठेवावयाच्या तांत्रिक बाबी

  1. खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार १.५ × १.५ फूट असावा व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे खड्ड्याची खोली २ ते ३ फूट असावी. त्यात मधोमध फाउंडेशन पाईप बसवून त्यास होल्डफास्ट बार टाकून काँक्रीट भरताना सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण १:४:८ याप्रमाणे घ्यावे. गटरला उतार हा पाया करताना १.५ ते २ टक्के ठेवावा.
  2. छताला ठेवण्यात येणारे व्हेन्ट 0.८ ते १.0 मीटर उंचीचे असावे व व्हेंन्टची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी.
  3. दोन कंपार्टमेंटमधील छताला पॉलिथिन फिल्मवरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जी. आय. पत्र्याचे (१ मि.मी. जाडी) किंवा २ ते ३ मि.मी. जाडीची अतिनील स्थिर पालीथीलीन कापडाच्या फिल्मचे गटर असावे.
  4. छतासाठी लागणारी फिल्म अल्ट्राव्हायोलेट स्टॅबिलाईड प्लॅस्टिकची असावी व त्याची जाडी २oo मायक्रॉन / ८oo गेज असावी. फिल्म वापरताना इतर निकष आय.एस.-१५८२७:२00९ मानांकनाप्रमाणे असावे. साधारणपणे १ किलो फिल्ममध्ये ५.३ चौ.मी. क्षेत्र आच्छादता येते. फिल्मची पारदर्शकता उच्च दर्जाची (८o ते ८५ टक्के) असावी.
  5. पॉलिथिन फिल्मची फिटींग अॅल्युमिनीयम चॅनल पट्टीमध्ये जी.आय. स्प्रिंगच्या सहाय्याने करावी.
  6. चारही बाजूने वायुर्वीजनासाठी २ मीटर उंचीची जागा ठेवावी व ती रात्रीच्या वेळी पडद्याच्या सहाय्याने बंद करण्याची सोय ठेवावी.
  7. हरितगृह उभारणीसाठी वापरण्यात येणा-या साहित्यापैकी या साहित्यांचे आयएसआय / बी.आय.एस. मानके निश्चित करण्यात आलेली आहेत ते साहित्य मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे.

पॉलिथिन : अतिनील किरणे स्थिर (UV Stabilized) ३५0 एनएम, डिफ्युझङ्, २०० मायक्रॉन जाडी, मल्टीप्लेयर (कमीतकमी ३ थर) आय.एस. - १५८२७:२00९ बी.आय.एस. मानांकनानुसार असावी.

  • शेडनेट : अतिनील किरणे स्थिर (UV Stabilized) ५० टक्के (१oo जी.एस.एम.) किंवा ७0 टक्के (१२0 जी.एस.एम.) आय.एस.-१६00८:२0१२ बी.आय.एस. मानांकनानुसार असावी.
  • इन्सेक्टनेट : अतिनील किरणे स्थिर (UV Stabilized) ४0 मेश, पांढरा रंग, १o५-११0 जीएसएम, कर्टनच्या पाठीमागे.
  • अॅल्युमिनियम प्रोफाईल : १९o-२२0 ग्रॅम/मी.
  • लॉकिंग स्प्रिंग : २.३ मि.मी. जाडी, दोन्ही बाजूने पावडर कोटेड,
  • हरितगृह/शेडनेटहाऊस यामध्ये स्टील वायर रोप वापरल्यास ते मानांकनाप्रमाणे असावा.

8.  सर्वसाधारण प्रकारचे हरितगृह उभारणीसाठी विविध भाग / बाबीसाठीचे तांत्रिक निकष खालीलप्रमाणे आहेत.

  • सर्व पाईप गॅलव्हानाईड आयर्न (जी.आय.) चे असावेत.
  • पाईपचा व्यास २.५' असावा व त्याची जाडी बी.आय.एस. नामांकनानुसार २.९ मि.मी. असावी.
  • पाईप एकमेकांना वेल्डिंगने न जोडता नष्टबोल्टने जोडावेत.
  • हरितगृहाच्या पायाचा ढाळ १.५ ते २ टक्के असावा. त्याचबरोबर गटरचा ढाळ सुध्दा हरितगृहाच्या पायाइतकाच असावा.
  • हरितगृहामध्ये उभारल्या जाणा-या पाईपांच्या दोन ओळीतील अंतर ८ मीटर व दोन पाईपमधील अंतर ४ मीटर असावे.
  • हरितगृहाची उंची ६ ते ६.५ मीटर असावी.
  • गटरची उंची कमीतकमी ४ मीटर असावी.
  • बाजूचे पडदे कमीतकमी २ मीटर उंचीचे ठेवावेत.
  • हरितगृहातील वरील बाजूची वायुविजनसाठी असलेल्या खिडकीची उंची कमीतकमी १ मीटर असावी. ९) वातावरण नियंत्रित हरितगृहाच्या उभारणीसाठी सर्वसाधारण तांत्रिक निकष खालीलप्रमाणे असावेत.
  • हरितगृहाच्या पायाचा ढाळ १.५ ते २ टक्के असावा. त्याचबरोबर गटरचा ढाळ सुध्दा हरितगृहाच्या पायाइतकाच असावा.
  • हरितगृहामध्ये उभारल्या जाणा-या पाईपांच्या दोन ओळीतील अंतर ८ मीटर व दोन पाईपमधील अंतर ४ मीटर असावे.
  • हरितगृहाची उंची कमीतकमी ४ मीटर असावी.
  • हरितगृहातील पेंडस् व फॅन उभारणीसाठी १.५ फूट खोल व १.५ फूट रुंद आकाराचे खडे काढावेत या खड्ड्यामध्ये ८ इंच नंतर १:४:८ या प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी यांचे मिश्रण ४ इंचापर्यंत भरून घ्यावेत. त्यानंतर राहिलेल्या ६ इंच खोल खड्ड्याचा भाग विटाने बांधून घ्यावा व त्यावर २ फूट उंच विटांची भिंत बांधून त्यावर पॅडस् व फॅन बसवावेत.
  • विटाने बांधलेल्या भिंतींना प्लॅस्टर करुन सिमेंटपेंटचे २ थर द्यावेत.
  • या प्रकारच्या हरितगृहात सेल्युलोज प्रकारचे पॅड वापरणे आवश्यक आहे. इतर प्रकारचे पॅड वापरू नयेत.

आच्छादन साहित्याचे गुणविशेष-

आच्छादनासाठी वापरावयाच्या साधनांमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक असते.

  1. प्रकाश पारदर्शकता व प्रसारण : आच्छादनाने हरितगृहात सर्वाधिक उजेड प्रसारित करतानाच पिकासाठी हानिकारक ठरणा-या घटकांना (अतिनील, अवरक्त किरणे) रोखले पाहिजे. सूर्यप्रकाशात विविध तरंग लांबीचे किरण असताना व त्यात मानवाला तसेच झाडांसाठी उपयुक्त असणारे किरण ४oo ते ७o० नॅनोमीटर या तरंगलांबीचे असतात. म्हणून हरितगृहासाठी वापरली जाणारी पॉलिथिन बनविताना ती केवळ प्रकाश संश्लेषणासाठी लागणारे किरणच प्रसारित करेल अशी असावी लागते.
  2. दीर्घकाळ टिकाऊक्षमता : फिल्मच्या पॉलिथिनवर सूर्यकिरणातील अतिनील किरणांचा परिणाम होतो. या घटकापासून संरक्षण करण्यासाठी फिल्ममध्ये काही विशिष्ट रसायने मिसळली जातात. या रसायनांमध्ये अतिनील किरण शोषून घेणारे किंवा अतिनील किरणांचे स्थिरीकरण करणारे घटक असतात. या रसायनामुळे पॉलिथिनच्या विघटनाचा वेग कमी करता येतो. टिकाऊपणास कारणीभूत असलेला दुसरा घटक म्हणजे त्याची जाडी होय. अधिक जाड फिल्म लवकर खराब होत नाही.
  3. धुके प्रतिबंधकता : फिल्ममध्ये काही धुके प्रतिबंधक घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक फिल्मवर साबणासारखे काम करतात. यामुळे दवामुळे फिल्मवर साचलेले पाणी तिथेच टपकण्याऐवजी फिल्मवर पातळ थर निर्माण करतात. त्यामुळे पाणी ठिबकत नाही.
  4. धूळ प्रतिबंधक : हरितगृहाच्या फिल्म्सवर धूळ जमा होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते. हे होऊ नये, यासाठी विशिष्ट घटक वापरून फिल्म गुळगुळीत केली जाते. त्यामुळे फिल्मवर धूळ चिकटणे काही प्रमाणात कमी होते.
  5. पाकळ्यांच्या काळपटपणास प्रतिकारकता : सूर्यप्रकाशातील इन्फ्रा रेड किरणांमुळे काही लाल गुलाबांच्या जातीच्या पाकळ्या काळपट होतात. ही विकृती कमी करण्यासाठी इन्फ्रारेडरोधक फिल्म्स वापरली जाते.
  6. शैवाल प्रतिकारकता : पावसाळ्यात फिल्मवर शेवाळ तयार होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते, त्यावर शैवाल प्रतिकारक घटक वापरुन हा त्रास कमी करता येतो.

No comments:

Post a Comment