घेवडा पीक लागवड तंत्रज्ञान

घेवडा पीक लागवड तंत्रज्ञान

डॉ. . एम. सोनकांबळे, विभाग प्रमुख, भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

घेवडया मध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण मुबलक असते. या शेंगात , , जीवनसत्त्वेआणि प्रथिने सुद्धा भरपूर असतात.

जमीन हवामान
पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन भरपूर सेंद्रिय खताचा पुरवठा असणारी जमीन पीक
वाढीसाठी आवश्यक आहे. घेवडा पिकासाठी भारी कसदार जमिनीपासून ते हलकी रेताड जमीन चालते. या पिकास थंड हवामानाची गरज असते.

पूर्वमशागत
घेवडा लागवडीसाठी जमीन नांगरून कुळवून काडी-कचरा वेचून लागवडीसाठी तयार करावी. त्यानंतर
मीटर अंतरावर ५० ते 0 सें.मी. रुंदीचे पाट काढावेत, असे पाट पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उन्हाळी हंगामात पाणी देण्यासाठी उपयुक्त असतात. शेतात आडवी उभी नांगरणी केल्यावर
ढेकळे फोडून वखरणी करावी. चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३० ते 0 गाड्या टाकून पुन्हा वखरणी करावी.

लागवडीची वेळ
घेवडा या पिकाची लागवड उन्हाळी हंगामात जानेवारी - फेब्रुवारीमध्ये करावी.

लागवडीची पद्धत अंतर
घेवडा पिकाची लागवड सपाट वाफ्यात दांडाचे काठाने लहान आळ्यामध्ये बी टोकून ४५ > २०, ४५ >
१५ से.मी. ठेवावे. उंच वाढणाऱ्या जाती ६० > ३० सें.मी. अंतर ठेवावेबियाणे सुधारित जाती : घेवडा पिकाच्या पेरणीकरिता हेक्टरी ४० ते ५० किलो बियाण्यांची आवश्यकता असते. घेवडा पिकासाठी पुसापार्वती, अर्का कोमल, फुले सुयश, कटेन्डर या जातींचा वापर करावा.

खत व्यवस्थापन
घेवडा पिकासाठी खताचे व्यवस्थापन माती परीक्षणाच्या आधारावर करावे. सर्वसाधारणपणे घेवडा पिकाला प्रति हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो पालाश घ्यावे. साधारणपणे प्रत्येक आळ्यात दीड ते दोन किलो शेणखत द्यावे.

पाणी व्यवस्थापन
घेवडा पिकाला दर ते ८ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीचा मगदूर पिकाची गरज यानुसार हा कालावधी कमी-जास्त करावा.

आंतरमशागत
घेवडा पीक स्वच्छ निरोगी राहण्यासाठी ते निंदन घ्यावे. फळधारणा झाल्यावर फळे गवताने किंवा पाला पाचोळ्याचे सहाय्याने पूर्णपणे झाकून टाकावी. फळाखाली सुद्धा पालापाचोळा घालावा.

वेलींना आधार
घेवड्याचा वेल मांडवावर चढविणे आवश्यक आहे. वेल मांडवावर चढण्यासाठी बांबूच्या शिऱ्या किंवा
 सुभांचा उपयोग करावा मंडप साधारणतः मीटर उंचीचा करावा.मंडपासाठी बांबू किंवा लाकडी वासे वापरावे. मंडपावर सुभ किंवा शिर्या किंवा जाळी वापरावी.

कीड रोग व्यवस्थापन
घेवडा या पिकावर खोडमाशी तसेच करपा,मुळकूज, मर भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होतो. या किडींचे रोगांचो
योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

काढणी उत्पादन
घेवडा हे पीक ९० ते १०० दिवसांत तयार
 होते. घेवड्याची पूर्णपणे वाढ होऊन परिपक्व झालेली फळे वरचे वर काढत राहावीत. फळाची काढणी फळे कोवळी असताना करावीवेळोवेळी फळे जसजशी तयार होतील तशी फळाची काढणी करावी.
घेवडा पिकाचे हेक्टरी ४० ते ५० क्विंटल उत्पादन मिळते.

संपर्क : ९६५७७२५८५७

१२ | शेतकरी  जानेवारी  २०२०



No comments:

Post a Comment