सुरू उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ञ, संदेश देशमुख, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा
गा हवामान उसाला पोषक असले तरी उत्पादन वाढीसाठी
काही मर्यादा आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन खर्च, जमीन आणि
पाणी व्यवस्थापन, नवीन वाणांच्या शुद्ध निरोगी बेण्याची उपलब्धता, रोग,
कीड व तणनियंत्रण, उत्पादन वाढ तंत्रज्ञान, या सर्व बाबीमध्ये उसाचे
पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्राचा उत्पादन वाढीसाठी प्रामुख्याने
विचार करावा लागतो. ऊस हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे
पीक असल्यामुल्छे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे
अत्यंत गरजेचे आहे. सध्या उसाचे उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा
क्षेत्रानसार केला जातो. प्रतिहेक्टर उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर
मातीचे परीक्षण करून व उत्पादनाचे व्यवहार्य लक्ष्य डोव्व्यासमोर ठेवून
शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय, रासायनिक आणि जिवाणू खतांचा एकत्रित वापर
करून एकात्मिक अन्नद्र॒व्य व्यवस्थापन करणे अपरिहार्य आहे. साधारणपणे
१०० टन ऊस उत्पादनासाठी १२५ ते १५० कि्रें. नत्र, ६० ते ७५
कि.ग्रें. स्फुरद आणि १५० ते २०० कि.ग्रें. पालाश लागतो. यावरून
नत्र आणि पालाशची गरज अधिक असल्याचे दिसून येते. म्हणूनच ऊस
पिकासाठी अबननद्र॒व्यांचे आणि पर्यायाने रासायनिक खतांचा संतुलित वापर
आजच्या आधुनिक शेतीसाठी अपरिहार्य आहे. सूक्ष्म अन्नद्र॒व्यांची कमतरता
असल्यास शेणखताद्वारे ही अन्नद्रव्ये द्यावीत.
सांगली जिल्ह्यातील आष्टा तालुक्यात अनेक शेतकय्यांनी मातीची
तपासणी करून अन्नद्र॒व्ये व्यवस्थापन केल्याने उत्पादन एकरी ८० टनाच्या
पुढे गेले आहे. त्यासाठी जमिनीची सुपीकता पातत्ठी व पीक उत्पादनक्षमता
वाढविण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय, रासायनिक व जैविक असा
एकात्मिक वापर होणे आवश्यक आहे. उसाचे पीक एक वर्षपिक्षा अधिक
कालावधीसाठी शेतात उभे राहणार असल्याने त्याला खोल नांगरटीनंतर
शेवटच्या पाव्ीच्या अगोदर पुढीलप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करावा.
सेंट्रिय खतांचा वापर
जमिनीची सुपीकता नियमित आणि अबाधित कशी राहील याकड़े
लक्ष द्यावे लागणार आहे, त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अपरिहार्य
आहे. त्यामुझे जमिनीची जैविक आणि भौतिक सुपीकतेमध्ये वाढ होते.
तसेच सेंद्रिय खतांच्या वापरामुछे जमिनीत हवा खेलुती राहुन जमिनीची
जलधारण करण्याच्या क्षमतेबरोबरच जमिनीतील जिवाएूची संख्या, सेंद्रिय
कर्बाचे प्रमाण वाढते. यामुक्े अन्नद्र॒व्ये उपलब्ध होण्याचे प्रमाण देखील
वाढते. म्हणून रासायनिक खताबरोबर खाली नमूद केलेल्या सेंद्रिय
खतांपैकी जे उपलब्ध असेल ते वापरावे. तसेच सेंद्रिय खत लागणीपूर्वी
किंवा लागणीच्या वेछेसच वापरावे. कारण सेंद्रीय खताद्वारे अन्नद्रव्यांची
उपलब्धता ही सावकाश होते.
हिरवल्गीची खते
शेणखताची उपलब्धता कमी असत्यास पूरक खत म्हणून ऊस
लागणीपूर्वी ताग, धैचा, शेवरी, चव्ी, उडीद यासारखी हिरवव्गीचे
६ | शेतकरी । फेब्रुवारी | २०१९
पीक घ्यावे. तागापासून हेक्टरी २० ते २५ टन बायोमास जमिनीमध्ये
मिसव्ठला जातो. तागापासून ९० कि.्रें,, धैंचापासून हेक्टरी ८४ कि:
तर चव्ठीपासून हेक्टरी ७४ कि.ग्रें. नत्र जमिनीत मिसछला जातो, ऊस
लागणीपूर्वी ताग घेणे शक्य नसल्यास उसात आंतरपीक असे एका हंगामात
सलग दोन वेव्छा हिरवव्गीची पिके घ्यावीत.
शेणखत
शेणखतात ०.८० टक््के नत्र, 0.६५ टक््के स्फुरद आणि 0.८८ टक्के
पालाश असते. सुरू उसासाठी हेक्टरी २० टन (४० बैलगाड्या) शेणखत
वापरावे. यापैकी शेणखताची अर्धी मात्रा नांगरट व रोटाव्हेटर झाल्यानंतर
शेतात पसरून द्यावी व उरलेली अर्धी मात्रा सरी वरंबे तयार केल्यानंतर
सरीमध्ये पसरून द्यावी. शेणखत उपलब्ध नसल्यास उसासाठी इतर
सेंद्रिय स्रोतांचाही खालीलप्रमाणे वापर करणे आवश्यक आहे.
पाचटाचे कंपोष्ट
ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक राहिलेले उसाचे पाचट शेतातच
कुजविल्यास त्याचा ऊस पिकास व जमिनीस चांगला फायदा होतो.
पाचटामध्ये 0.४२ ते 0.५० टक्के नत्र, 0.१७ ते ०.२० टक्के स्फुरद
आणि ०.९० ते १.०० टक्के पालाश असते आणि ३२ ते ४० टक््के
सेंद्रिय कर्ब असते. एक हेक्टर क्षेत्रामधून ७.५ ते १० टन पाचट मिल्ठ्ते
आणि त्यापासून ३५ ते ५० कि.ग्रेँ. नत्र, १५ ते ३० कि.्रें. स्फुरद,
७५ ते १०० कि.ग्रें. पालाश आणि ३ ते ४ हजार कि्रें. सेंद्रिय कर्ब
जमिनीत मिसव्लले जाते.
प्रेसमड कंपोस्ट
साखर कारखान्यातून उत्पादित होणाय्या दुष्यम उप-पदार्थपिकी
प्रेसमड केक किंवा घट्ट काछसर मचा सेंद्रिय खत म्हणून वापर करता
येतो. प्रेसमड केकमध्ये १.५ टक््के नत्र, २.२५ टक्के स्फुरद आणि
१.० टक््के पालाश असते. लागणीच्या उसासाठी प्रतिहेक्टरी ६ टन
वाढलेली प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त खताची ३३ टक्के मात्रा कमी
करावी, तर प्रतिहेक्टरी ९ टन वाब्ललेले प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त
खतांची ६६ टकक्के मात्रा कमी करावी. सध्या काही साखर कारखाना
प्रक्षेत्रावर प्रेसमड केक + स्पेंटवॉश, उपलब्ध काडी-कचरा यांचे एकत्रित
कंपोष्ट केले जाते. याला प्रेसमड कंपोस्ट असे म्हणतात. प्रेसमड केक
किंवा प्रेसमड कंपोष्ट है नांगरट झाल्यानंतर सरी सोडण्यापूर्वी जमिनीमध्ये
टाकावे म्हणजे ते मातीत चांगले मिसक्ले जाते. परंतु याची मात्रा
शिफारशीपेक्षा जास्त वापरू नये.
गांडूळ खत
गांडूळ खतामध्ये ०.७५ ते २.० टक्के नत्र, 0.८२ टक्के स्फुरद
आणि ०.६५ ते १.२५ टक््के पालाश असते. ऊस पिकासाठी प्रतिहेक्टरी
५ टन गांडूलखत वापरावे. गांडूछ खत लागणीपूर्वी सरीमध्ये टाकून मातीने झाकावे. गांडूछ खताच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्र॒व्यांची कमतरता भरून निघते.
जिवाणू खते
उसाच्या बेण्याला असिटोबेक्टर हेक्टरी १० कि.ग्रें. आणि स्फुरद विरघव्वविणारे जिवाणू हेक्टरी १.२५ कि.ग्रें, १०० लीटर पाण्याच्या द्रावणात
३० मिनिटे बुडवून लागवड केली असता, ५० टकक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरद खताची बचत होऊन उत्पादनात वाढ होते. असिटोबेक्टर हे जिवाणू
बेण्याच्या पेशीमध्ये प्रवेश करून नत्राची बचत करतात व स्फुरद विरघवूविणारे जिवाणू जमिनीतील स्फुरद ऊस वाढीसाठी उपलब्ध करून देतात.
जिवामृत
उसाचे पीक जैविक खतांना प्रतिसाद देणारे पीक आहे, त्याकरिता ठिबक सिंचनाच्या माध्यमातृन जिवामृत उगवणीनंतर नियमित वापर केल्यास
उसाची जोमदार वाढ होऊन हेक्टरी उत्पादनात वाढ होते.
रासायनिक खतांचा वापर
ऊस हे दीर्घ मुद्तीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुल्ठे त्याची अन्नद्रव्यांची गरज ही फार मोठी आहे. त्यामुे ऊस पिकाला सेंद्रिय
खतांबरोबरच रासायनिक खत मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. युरिया खत देताना ती निंबोब्ठी पेंडीच्या भुकटीबरोबर ६:१ या प्रमाणात मिसक्ून द्यावीत.
हुमणी अब्गीच्या नियंत्रणासाठी ऊस लागवडीच्या काब्णत फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार) २५ कि.पग्रें. प्रतिहेक्टर मातीत मिसव्शावे. ऊस पिकासाठी
लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यत तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे खते द्यावीत.
ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन
ठिबक सिंचनाच्या माध्यमातृन खताचे नियोजन करत असताना उसाची लागण ५ फुटाच्या सरीवर किंवा जोडओछ पद्धतीने ३ फुटावर सरी पाडून
लागण करावी. मध्यम खोल, काव्व्या जमिनीत सुरू उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खताचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायद्यासाठी १०० टक्के
विद्राव्य खते खालील तक्त्यानुसार दर आठवड्यास एक याप्रमाणे ४४ हप्त्यात ठिबक सिंचनातून दिल्यास खतमात्रेमध्ये २५- ३० टक्के बचत होऊन ऊस
उत्पादनात १०-१५ टक्के वाढ होते
हे
शेतकरी । फेब्रुवारी | २०१९ | ७
१६ ते २१
माती परीक्षण व अपेक्षित उत्पादन लक्ष्य ठेवून खत व्यवस्थापन
सध्याचे शिफारस केलेले खतांचे प्रमाण हे जमिनीचा प्रकार व सुपीकता यांचा विचार न करता पिकानुरूप ठरविण्यात आलेले आहे. समजा भारी व
मध्यम जमिनीत वरीलप्रमाणे खते वापरली तर भारी जमिनीतील उसाचे उत्पन्न हलक्या जमिनीपेक्षा निश्चितच अधिक येईल व नफा देखील जास्त मिल्ठेल.
या तंत्राद्वारे शेतकय्यांना त्याच्या आर्थिक कुवतीप्रमाणे खतांचा वापर करून अपेक्षित उत्पन्न मिक्विता येते. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या तंत्रात
पिकाची गरज किती आहे आणि जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे या दोन आधारावर किती खते वापरावीत है ठरविता येते. या तंत्राचा
वापर करताना खतांच्या संतुलित व कार्यक्षम वापरासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. याबाबतचा अधिक तपशील स्वतंत्र लेखामध्ये नमूद करण्यात
आलेला आहे.
अपेक्षित उत्पादनाचे लक्ष्य विचारात घेऊन खत व्यवस्थापन करावयाचे असल्यास
जमिनीमध्ये असलेले उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश (कि./हे.) व अपेक्षित उत्पादन (टन/हे.) यांचा उपयोग करून खतमात्रा खाली दिलेल्या
समीकरणाद्वारे काढावी
) खतामधून द्यावयाचे नत्र (कि.प्रें,/हे.) ८ (४.७६ »< अपेक्षित उत्पादन, टन/हे १.३४ »< जमिनीतील उपलब्ध नत्र, कि. /हे
ब) खतामधून द्यावयाचे स्फुरद (कि.प्रें. /है.) < (१.२४ »< अपेक्षित उत्पादन, टन/हे.) - (१.५५ »< जमिनीतील उपलब्ध स्फुरद, कि:्रें./हे.)
क) खतामधून द्यावयाचे पालाश(कि:्रें./ है.) < (२.७६ >»< अपेक्षित उत्पादन, ट./हे ०.२१ %< जमिनीतील उपलब्ध पालाश, कि्रे. /हे
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
ज्या जमिनीत लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्र॒व्यांची कमतरता आहे, त्या जमिनीत रासायनिक खतांव्यतिरिक्त लोहासाठी
२५ कि.ग्रें. हिराकस, जस्तासाठी २० कि.ग्रेँ. झिंक सल्फेट, मंगलसाठी १० कि.ग्रेँ. मैगेनीज सल्फेट आणि बोरॉनसाठी ५ कि... बोरैंक्स प्रतिहेक्टर
वापरावे. सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करताना ते चांगल्या कुजलेल्या शेणखत किंवा कंपोष्ट खतात मिसकन त्यावर पाणी शिंपडावे व ५ ते ६ दिवसांनी चांगले
मुरल्यावर ते वर दिलेल्या रासायनिक वरखतांच्या मात्रेसोबत जमिनीत चव्ी घेऊन द्यावीत.
खते देताना घ्यावयाची काछूजी
१) खते देताना ती जमिनीवर पसरून न देता मातीत मिसव्ठण्यासाठी जमिनीत ४ ते ५ सें.मी. खोल चव्छी घेऊन द्यावी आणि खत मातीआड करावे
२) जमिनीत वापसा असताना खते द्यावीत. पिकास रासायनिक खते दिल्यानंतर दुसन्या दिवशी हलके पाणी द्यावे
३) स्फुरदयुक्त खते कंपोष्ट किंवा शेणगखतात मिसक्तन दिल्यास फायद्याचे ठरते
४) पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोट्टेश या खताची मात्रा ५० टक्कक््याने वाढवून द्यावी
५) हिरव्लीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास उसासाठी स्फुरद खताची २५ टक्के मात्रा हिरव्लीच्या पिकास द्यावी आणि उरलेली
५ टक्के मात्रा लागणीच्या वेब्छी तर ५० टक्के मात्रा बांधणीच्या वेब्ही द्यावी.
अशा रितीने ऊस पिकास पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी संतुलित खतांचा वापर करणे अत्यावश्यक असल्याने रासायनिक, सेंद्रिय व जैविक
खतांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकवून ऊस उत्पादनात भरघोस वाढ होते.
संपर्क : संदेश देशमुख, मो. ८२७५५१८९२०
८ | शेतकरी । फेब्रुवारी | २०१९
ऊस बाबत माहिती
No comments:
Post a Comment