शेवगा लागवड तंत्रज्ञान व औषधी गुणधर्म
डॉ. मधुकर भालेकर, डॉ. सखेचंद अनारसे, श्री. बाळासाहेब कागणे
अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि अहमदनगर
भारत शेवग्याच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय मूळ असणाऱ्या या शेवग्याने आपल्या अद्भुत गुणधर्म आणि विशिष्ट गुणवत्तेमुळे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
शेवगा लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आंध्रप्रदेशात असून त्याखालोखाल कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ८० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे. यातील बऱ्याचशा जमिनी
हलक्या, भरड आणि नापिक म्हणून पडून आहेत. महाराष्ट्रात घराच्या सभोवती लागवड करण्याची प्रथा आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड सुरू झालेली आहे.
शेवग्याच्या शेंगा बाजारपेठेत पाठविताना इतर भाजीपाल्याप्रमाणे विशेष खर्चीक पॅकिंग लागत नाही व बाजारपेठेत पोहचेपर्यंत माल खराब होत नाही. शेवग्याच्या शेंगात व पानात अ आणि क जीवनसत्त्व तसेच चुना (कॅल्शियम), लोह व प्रथिने मुबळक प्रमाणात आढळतात. वाळलेल्या शेवग्याच्या बियापासून तेल काढतात. या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर होतो. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याकरिता शेवग्याच्या शेंगांतील बियांची पावडर अत्यंत उपयुक्त आहे. शेवग्याचा प्रत्येक भाग हा पोषणमूल्यांनी भरलेला आहे. त्यामुळेच तो औषधासाठीही उपयुक्त आहे. शेवग्याच्या या गुणवैशिष्ट्यांमुळे शेवग्याला बाजारात मागणी खूप आहे. अशा या बहुगुणी शेवग्याची लागवड कोरडवाहू शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
हवामान व जमीन :
शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत येते. जेथे
पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो. पश्चिम महाराष्ट्रातही शेवग्याची लागवड होते परंतु अशा जमिनीत झाडे कोरडवाहूच आढळतात. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीतही शेवग्याची लागवड होते परंतु अशा जमिनीत झाडे उंच वाढतात. पानांची वाढ जास्त, ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते.
जाती :
शेवग्यामध्ये फारशा जाती उपलब्ध नाहीत परंतु अनेक खेड्यांमध्ये आणि विभागात वाढणाऱ्या झाडांमध्ये चव व रंग याबाबत विविधता आढळते. चांगली शेंग म्हणजे शेंगांची लांबी ५० ते ६0 से.मी. असावी. त्यात भरपूर गर असावा. कडवट चव असणाऱ्या शेंगास भाव मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला २ ते
३ दिवस टिकून राहावा. बर्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात. तसेच दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे एखादे झाड निवडावे. अशा झाडाचे फाटे वापरून लागवड केली असता चांगले उत्पादन देणारा वाण मिळू शकतो. शेवगा बहुपयोगी असला तरी यावर विशेष असे संशोधन न झाल्यामुळे हे पीक काहीसे दुर्लक्षित राहिलेले आहे. सध्या तामिळनाडू कृषि विश्वविद्यालय, कोइमतूर या संस्थेने कोइमतूर-१,
कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसारित केलेले आहेत. तसेच कोकण कृषि विद्यापीठाने कोकण रुचिरा वाण प्रसारित केलेला आहे.
या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच असून झाडास १६ ते २२ फांद्या असतात तसेच बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापीठाने “भाग्या ही जात चांगल्या उत्पादनासाठी विकसित केली आहे.
लागवड :
व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास पावसाच्या पूर्वी ६० सें.मी. लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगळी माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५:१५:१५ (२५० ग्रॅम) आणि ट्रायकोडर्मा प्लस पावडर ५० ग्रॅम टाकावी अशा प्रकारे खड्डा भरून घ्यावा. लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३.० मीटर ठेवावे. शेवग्याची अभिवृद्धी फाटेकलम व बियापासून रोपे तयार करून केली जाते. परंतु बियाणापासून लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म असलेली झाडे मिळू शकत नाहीत. तसेच बिया लागवडीपासून केलेल्या झाडापासून शेंगा फाटेकलमापेक्षा ३ ते ४ महिने उशिरा मिळतात. फाटेकलमापासून लागवडीसाठी ५ ते ६ सें.मी. जाडीच्या सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात.
लागवडीचा हंगाम :
कमी पावसाच्या प्रदेशात पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. तेव्हा याचवेळी लागवड करावी. फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी व हातपाणी द्यावे. लागवडीनंतर
६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन झाडे जगवावी किंवा झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात २ ते ३ लीटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे व त्यामध्ये ५ ते ६ दिवसाच्या
अंतराने पाणी टाकावे. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र असावे आणि त्यात कापडाची लहान चिंधी घातलेली असावी. यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा सुध्दा वापर करता येईल. झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज
भासत नाही. आंतरपीक म्हणूनही शेवगा पीक घेता येते. कलमी आंबा, चिकू, जांभूळ, फणस व गावरान आंबा यांच्या झाडांमधील भागात पहिले ५ ते ६ वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.
लागवडीनंतर घ्यावयाची काळजी :
शेवगा लागवडीनंतर आवश्यक महत्त्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर,
झाडाची योग्य छाटणी या बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुद्धा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते. शेवग्याला प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते. यासाठी लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे आणि चार दिशाला चार फांद्या वाढू द्याव्यात. झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल. त्यानंतर ३ ते ४ महिन्यांनी चारही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल व झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल व उत्पादन वाढेल. पुढे जसेजसे जुने होईल तसतसे दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.
कीड व रोग नियंत्रण :
या पिकावर कीड व रोगाचा फारसा प्रादर्भाव दिसून येत नाही. परंतु पोषक वातावरण निर्माण झाल्यास पुढील रोगव किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
शेवगा पिकावर येणारे मुख्य किडी
१) फुलकिडे :
या किडीची पिले आणि प्रौढ कोवळी पाने आणि शेंगांचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून रस शोषून घेतात त्यामुळे पानांवर आणि शेंगांवर चट्टे पडतात. शेंगांचा आकार वेडावाकडा होतो. फुलकिडे खरवडलेल्या भागावर बुरशींचा शिरकाव होऊन बुरशीजन्य रोग वाढतात. शेंगांची प्रत खराब होते
उपाय : लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा.शेतामध्ये प्रति एकरी २० निळे चिकट सापळे लावावेत. फुलकिडे दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मि.ली. प्रति लीटर या प्रमाणे फवारावे
किंवा जैविक कीडनाशक मेटाऱ्हाझीअम अनिसोपली पावडर ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारावे.
२) लाल कोळी :
शेंड्याकडील पानांवर ही कीड झुपक्याने आढळून येते. अतिशय बारीक आणि लाल रंगाचे हे कोळी कोवळ्या पानांतून रस शोषून घेतात. त्यामुळे पिकांची पाने आकसतात आणि चुरमूडतात.पानाच्या खालच्या बाजूस तांबूस रंग येतो. शेंगांची प्रत खराब होते.
उपाय : प्रादुर्भाव दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मि.ली. किंवा निंबोळी तेल २ मि.ली. प्रति लीटर या प्रमाणात फवारावे किंवा जैविक कीडनाशकामध्ये व्हर्टीसिलीअम लेकॅनी ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारावे.
३) खोड आणि फांद्या पोखरणारी अळी :
अळी झाडाचे खोड पोखरून आत शिरते. झाड कमकुवत होते आणि खोडावर छिद्रे दिसतात.छिद्राभोवती अळीची भुसामिश्रीत विष्ठा दिसून येते. उत्पादनात घट येते.
उपाय : पेट्रोलमध्ये बुडविलेला कापसाचा बोळा अळीने पाडलेल्या छिद्रात टाकावा किंवा डायक्लोरोव्हॉस हे कीटकनाशक अळीच्या छिद्रात टाकावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे.
४) पाने गुंडाळणारी अळी :
या किडीची अळी शेवग्याची पाने व फुले यांचे नुकसान करते. पानांची आणि फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होते. अळी शेंगाचे देखील नुकसान करते.
उपाय : या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अधून-मधून अळीने गुंडाळलेली पाने एकत्र गोळा करून नष्ट करावी.
शेवगा पिकावरील मुख्य रोग
१) मूळकूज किंवा खोडकूज :
खोडाजवळ जास्त काळ ओलावा राहिल्यास किंवा खोडावर सतत पाणी पडत राहिल्यास खोडकूज
होऊन झाडे मरतात.
उपाय : लागवडीपूर्वी जमिनीमध्ये शेणखतासोबत ट्रायकोडर्मा प्लसचा वापर करावा. खोडाजवळ सतत पाणी पडणार नाही, याची काळजी घ्यावी व त्याप्रमाणे ड्रिपर झाडापासून अलग करावे. उभ्या पिकामध्ये झाडांची खोडकूज होऊन मर होण्यास सुरुवात झाल्यास फोसेटील अँल्युमिनीयम किंवा मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब यापैकी एक बुरशीनाशक ५०० ग्रॅम २०० लीटर पाण्यातून प्रति एकर ड्रिंपद्रारे सोडावे.
२) भुरी :
पानावर आणि फळावर पांढऱ्या बुरशीचे जाळे आढळून येतात.पाने पिवळसर पडून वाळून जातात. पाने आणि फुले यांची गळ होते.पिकाची वाढ खुंटते.
उपाय : भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याबरोबर पाण्यात विरघळणारे ८0 टक्के गंधक २ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात पिकावर फवारावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास हेक्झाकोनॅझोल किंवा डायफेनोकोनॅझोल
अर्धा मि.ली. प्रति लीटर पाणी यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. ड्रिपमधून मायक्लोब्यूटॅनील ५० ग्रॅम किंवा अँझॉक्सीस्ट्रोबीन १०० मि.ली. २०० लीटर पाण्यातून प्रति एकर सोडावे.
काढणी व उत्पादन :
सुधारीत जातींची लागवड केल्यास लागवडीपासून सुमारे ६ ते ७ महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागद गोणपाटावर गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो व अशा प्रकारे सहा ते सात महिन्यानंतर
प्रत्येक हंगामात एक चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात.
शेवग्याचे औषधी गुणधर्म
शेवग्याचा प्रत्येक भाग हा पोषणविषयक तसेच औषधीविषयक कामासाठी उपयुक्त आहे. म्हणून अशा बहुपयोगी वनस्पतीला आधुनिक काळाची गरज असणारा कल्पवृक्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
शेवग्याची पाने :
शेवग्यामध्ये ९२ पोषक तत्त्व, ४६ अँटिऑक्सिडंट्स ३६ अँटिइन्फ्लमेन्टस व ८ अमिनो “अ' अँसिड्स असतात.
शेवग्यामध्ये आढळणारी प्रथिने दह्यात असणाऱ्या प्रथिनांच्या दुप्पट असतात तर पोटॅशियमचे प्रमाण हे केळीत आढळणाऱ्या पोटॅशियमच्या तिप्पट असते. त्याचप्रमाणे दूधात जेवढे कॅल्शियम असते आणि गाजरात जेवढे 'अ” जीवनसत्त्वाचे प्रमाण असते, त्यांच्या चार पटींनी अधिक प्रमाण शेवग्यामध्ये असते. संत्र्यात आढळणारे क" जीवनसत्त्व शेवग्यामध्ये सात पर्टीनी अधिक असते. निश्चितच अशा गुणकारी
शेवग्याचा उपयोग नवजात बालक व गर्भवती स्त्रियांचे कुपोषण रोखण्यासाठी होऊ शकतो.
शेवग्याच्या बिया :
शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते, त्या तेलाचा उपयोग केस गळती थांबवण्यासाठी, चेहरा उजळ करण्यासाठी, पायांची मालीश करण्यासाठी केला जातो. शेवग्याच्या १० ते १२ बियांचे दररोज सेवन केल्याने वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जलशुद्धीकरण प्रक्रियेत शेवग्यांच्या बियांचा वापर तुरटीसारखा
करता येतो. शेवग्याच्या बियापासून तयार केलेल्या पावडरचा उपयोग, जनावरांसाठी पेंड बनवण्यासाठी व त्वचा रोग कमी करण्यासाठी केला जातो.
शेवग्याच्या शेंगा :
भारतीय जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते, तसेच शेवग्याच्या शेंगातील हिरव्या बिया काढून त्याला मीठ लावून वाटाण्यासारखे खाणेही लोक पसंत करतात. उडपी रेस्टॉरंटची वाढती संख्या आणि सांबारची आवड या गोष्टींमुळे दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत शेवग्याच्या शेंगाचा
स्वयंपाक घरात सर्रासपणे वापर केला जातो.
शेवग्याच्या झाडाची साल :
या झाडाच्या ओल्या सालीचा उपयोग सर्पदंश किंवा विंचू दंश यावर उपाय म्हणून केला जातो. लहान बालकांमधील कान दुखणे किंवा दात दुखणे यावर शेवग्याची साल हा गुणकारी उपाय आहे. दोरखंड बनवण्यासाठी व डिंक मिळवण्यासाठी शेवग्याच्या सालीचा उपयोग केला जातो.
शेवग्याचे फुल :
फेपरे येणे, स्नायूदुखी यावरील उपायात शेवग्याच्या फुलांचा उपयोग केला जातो. मध उत्पादनासाठी गुजरात राज्यामध्ये शेवग्याच्या फुलाचा वापर यशस्वीरीत्या करण्यात आला आहे.
शेवग्याची मुळे :
शेवग्याच्या लहान झाडांची मुळे वाटून पावडर बनवली जाते व त्या पावडरचा उपयोग शेंगा नसलेल्या काळामध्ये मसाला म्हणून केला जातो. शेवग्याच्या मुळांची पावडर दुधात मिसळून पिल्याने दमा, किडणीचे आजार, अर्धांगवायू किंवा मूळव्याध कमी करण्यास मदत होते.
संपर्क : ९४०३१८४७५२
शेतकरी । जानेवारी । २०२० | १५ १६ | शेतकरी । जानेवारी । २०२०
शेतकरी | जानेवारी । २०२० | १७

No comments:
Post a Comment