मेथी /कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान
डॉ. मधुकर भालेकर, प्रा.
धनश्री पाटील, प्रा. सोमनाथ
पवार, अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्प,
भाजीपाला पिके, महात्मा फुले
कृषि विद्यापीठ राहुरी
मे! हिरवी पाने आणि
कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात.
थीच्या बियांचा म्हणजे मेथ्यांचा
मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये
तसेच भाजी करताना
उपयोग करतात. मेथीमध्ये
औषधी गुणधर्म आहेत.
मेथीची भाजी पाचक
असून मेथीच्या भाजीमुळे
यकृत आणि प्लीहा
यांची
कार्यक्षमता
वाढून पचनक्रिया सुधारते.
मेथीमध्ये प्रोटिन्स आणि मॅग्नेशियम,
फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, इत्यादी
खनिजे तसेच 'अ'
आणि 'क'
जीवनसत्त्वे
भरपूर प्रमाणात असतात.
हवामान आणि जमीन
: मेथी हे थंड
हवामानात वाढणारे पीक आहे
विशेषत: कसुरी मेथीस थंड
हवामान मानवते म्हणून हिवाळ्यात
या
मेथीची लागवड करतात. मेथी
हे कमी दिवसात
तयार होणारे पीक
आहे. विविध प्रकारच्या हवामानात
मेथीचे पीक येत
असले तरी उष्ण
हवामानात पिकाची वाढ कमी
होऊन चांगल्या दर्जाची
भाजी मिळत
नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम
ते कसदार आणि
पाण्याचा
चांगला निचरा होणारी जमीन
असावी. क्षारांच्या व चोपण
जमिनी मेथी
पिकाला प्रतिकूल असतात; त्यामुळे
त्यात लागवड टाळावी.
मेथी हे शेंगा
कुळातील पीक असून
मेथीचे मुख्य दोन प्रकार
आहेत.
१) कसुरी मेथी : या
मेथीची पाने लहान,
गोलसर असून तिची
वाढ
सुरुवातीला
फारच सावकाश होते.
रोपे लहान झुडूपवजा
असतात
आणि फांद्या आणि देठ
नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात.
तसेच
या मेथीची फुले आकर्षक
पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर
येणारी
असून शेंगा लहान, कोयत्याच्या
आकाराच्या आणि बाकदार
असतात
तर बिया नेहमीच्या
मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी
मेथी अधिक
सुगंधित आणि स्वादिष्ट
असते.
२) नेहमीची मेथी : ही
मेथी लवकर वाढते.
या मेथीला भरपूर
फांद्या
येतात. आणि वाढीची
सवय उभट असते.
या मेथीची पाने
लंबगोल
किंवा गोलसर असतात. या
मेथीची फुले पांढरी
असून ती शेंड्याकडे
पानाच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी
दोन किंवा तीन
येतात. या
मेथीच्या शेंगा लांब आणि
बी मोठे असते.
सुधारीत वाण
१) कसुरी सिलेक्शन : या
मेथीची पाने लहान,
गोलसर असून तिची
वाढ
सुरुवातीला
फारच सावकाश होते.
या मेथीची रोपे
लहान झुडूपवजा
असतात आणि फांद्या
आणि देठ नेहमीच्या
मेथीपेक्षा बारीक असतात.
या मेथीची फुले आकर्षक
पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर
येणारी
असून शेंगा लहान, कोयत्याच्या
आकाराच्या आणि बाकदार
असतात,
तर बिया नेहमीच्या
मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी
मेथी अधिक
सुगंधित आणि स्वादिष्ट
असते. कसुरी मेथीमध्ये
कसुरी सिलेक्शन
(पुसा सिलेक्शन) हा सुधारित
वाण भारतीय कृषी
संशोधन संस्था,
नवी दिल्ली यांनी विकसित
केला असून तो
दोन महिन्यात तयार
होतो. हा वाण
उशिरा तयार होणारा
असला तरी त्याचे
अनेक खुडे
घेता येतात आणि हा
वाण परसबागेत लावल्यास
फारच उपयुक्त
आहे. बी तयार
होण्यास १५० ते
१६० दिवस लागतात.
२) पुसा अर्ली
बंचिंग : हा वाण
लवकर वाढतो. या
मेथीला भरपूर फांद्या
येतात आणि वाढीची
सवय उभट असते.
या मेथीची पाने
लंबगोल
किंवा गोलसर आणि मोठी
असतात. या मेथीची
फुले पांढरी असून
ती शेंड्याकडे पानांच्या बेचक्यातून
प्रत्येक ठिकाणी दोन किंवा
तीन
येतात. या मेथीच्या
शेंगा लांब आणि
बी मोठे असते.
पुसा अर्ली बंचिंग
ही सुधारित जात भारतीय
कृषि संशोधन संस्था
यांनी विकसित
केली आहे. या
मेथीची वाढ उभट
व लवकर होते.
पाने हिरवी असून
१२५ दिवसांत बी तयार
होते.
३) मेथी नं.४७ : महाराष्ट्रात
मेथी नं. ४७
हा सुधारित वाण
विकसित
करण्यात आला आहे.
४) फुले कस्तुरी
: पानांच्या लालसर कडा, अधिक
फुटवे आणि अधिक
उत्पादन अशी वैशिष्ट्यपूर्ण
गुणधर्म असलेला मेथीचा फुले
कस्तुरी
हा वाण महात्मा
फुले कृषि विद्यापीठ
राहुरी येथून २०१९ साली
महाराष्ट्रात
प्रसारित करण्यात आला आहे.
मर, भुरी या
रोगास व
नागअळी या किडीस
मध्यम प्रतिकारक्षम आहे.
तसेच जीवनसत्त्व 'अ'
आणि तंतुमय पोषणमूल्ये भरपूर
प्रमाणात असतात.
बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणाची
लागवड केली जाते.
हिरवी, कोवळी
लुसलुशीत पाने, लवकर फुलावर
न येणे, कोवळेपणा
जास्तीत जास्त
टिकून राहणे ही या
चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये
आहेत.
लागवडीचा हंगाम : मेथी हे
थंड हवामानातील पीक
असले तरी
महाराष्ट्रातील
खरीप आणि रब्बी
हवामानात मेथीचे पीक घेतले
जाते. मेथीची लागवड खरीप
हंगामात जून-जुलै
महिन्यात आणि
रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर
महिन्यात करतात. भाजीचा सतत
पुरवठा होण्यासाठी पेरणी टप्प्याटप्प्याने
करतात. समशीतोष्ण
हवामान आणि पाण्याचा
नियमित पुरवठा असल्यास मेथीची
लागवड
वर्षभर करता येते.
परंतु थंड हवामानात
उत्पादन आणि पिकाचा
दर्जा
चांगला मिळतो.
बियाणे : नेहमीच्या मेथीच्या हेक्टरी २५
ते ३० किलो
बियाणे लागते.
तर कसुरी मेथीचे बी
बारीक असल्याने हेक्टरी २०
किलो बियाणे
लागते. मेथीचे पीक दुसऱ्या
पिकात आंतरपीक म्हणून
घेतल्यास
त्यानुसार बियाणे कमी लागते.
बियाणे पेरताना एकसारखे आणि
विरळ
पडेल याची दक्षता
घ्यावी.
लागवड पद्धती : मेथीची लागवड
सपाट वाफ्यांमध्ये २०
ते २५ सें.मी.
अंतरावर ओळीतून पेरून किंवा
बी फोकून करतात.
आंतरपीक म्हणून
मेथीचे पीक घेताना
मुख्य पिकामधील मोकळ्या
जागेत मेथीचे बी
२० ते २५
सें.मी. अंतरावर
ओळीत पेरावे. मेथीच्या
लागवडीसाठी
३ > २ मीटर
आकाराचे किंवा त्यापेक्षा अधिक
लांबीचे सपाट
वाफे तयार करून
त्यात बी फोकून
किंवा ओळीत पेरणी
करतात.
पेरणीनंतर लगेच हलके
पाणी द्यावे. बी
ओळीत पेरल्यास खुरपणी
आणि तण काढणे
सोपे होते. तसेच
काढणी करणे सोपे
जाते. नेहमीची
मेथी पेरणीनंतर ३ ते
४ दिवसांत उगवते
तर कसुरी मेथीची
उगवण
होण्यास ६ ते
७ दिवस लागतात.
खते आणि पाणी
व्यवस्थापन : पानांची चांगली वाढ
होण्यासाठी
मेथीच्या पिकाला नत्रयुक्त खताची
आवश्यकता असली तरी
हे
शेंगवर्गीय
कुळातील पीक असल्यामुळे
सुरुवातीला जमीन तयार
करताना हेक्टरी
१० ते १२
टन शेणखत व
२० किलो नत्र
आणि
त्यानंतर १५ दिवसांनी
खुरपणी करून हेक्टरी २०
किलो नत्र
उत्पादन आणि प्रत
सुधारते. पिकाचा खोडवा घेतल्यासही
वरीलप्रमाणे
खतांचा वापर करावा.
मेथीला नियमित पाणी देणे
आवश्यक आहे.
कोवळी आणि लुसलुशीत
भाजी मिळविण्यासाठी ४
ते ६ दिवसांच्या
अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पाण्याचा योग्य पुरवठा केल्यास
अधिक उत्पादन मिळून खोडवेही
जास्त घेता येतात.
या पिकाच्या
सुरुवातीच्या
काळात तण काढून
पीक स्वच्छ ठेवावे.
महत्त्वाच्या
किडी, रोग आणि
त्यांचे नियंत्रण : मेथीवर मावा
आणि
पाने पोखरणारी अळी (लीफ
मायनर) या किडींचा
प्रादुर्भाव होतो.
मावा कीड काळसर
रंगाची असून पानांच्या
खालच्या भागावर आणि
शेंड्यावर राहून मोठ्या प्रमाणात
पानांमधील रस शोषून
घेते. यामुळे
रोपे निस्तेज होऊन मालाची
प्रत खराब होते.
पाने पोखरणारी कीड
पानांमधील रस शोषून
घेत वेडीवाकडी पुढे
जाते. त्यामुळे पानांवर
पांढऱ्या रंगाच्या वेड्यावाकड्या ओळी
दिसतात आणि मालाची
प्रत
खराब होते. या किडीच्या
नियंत्रणासाठी पीक लहान
असतानाच
१० लीटर पाण्यात
१५ मि.ली.
डायमिथोएट मिसळून फवारावे व
५ टक्के निंबोळी अर्काची
फवारणी करावी. पीक काढणीच्या
८ दिवस
आधी औषधे फवारू
नयेत.
मेथीच्या पिकावर रोगाचा फारसा
प्रादुर्भाव होत नाही.
मात्र, काही
वेळा मर रोगाचा
प्रादुर्भाव दिसून येतो. या
रोगाच्या नियंत्रणासाठी
पिकांची फेरपालट करावी. पाण्याचा
चांगला निचरा होणारी जमीन
निवडावी. बियांची दाट पेरणी
करू नये. पिकाला
नियमित पाणी द्यावे
आणि शेतात स्वच्छता राखावी.
काढणी, उत्पादन आणि विक्री
: बी पेरल्यापासून ३०
ते
३५ दिवसांनी मेथीचे पीक
काढणीला तयार होते.
मेथीची काढणी
करताना संपूर्ण रोपटे मुळांपासून
उपटून काढतात किंवा
जमिनीलगत
खुडून घेतात. मेथीच्या पिकाचा
खोडवा २ ते
३ वेळा घेता
येतो.
कसुरी मेथीचे जास्त खोडवे
घेता येतात. प्रामुख्याने
हिवाळ्यात
खोडवा घेणे शक्य होते.
काही वेळा २
ते ३ खुडे
घेतल्यावर पीक
बियांसाठी ठेवतात. मेथीची पाने
तजेलदार असताना आणि फुले
येण्यापूर्वी
काढणी करावी.
काढणीच्या २ ते
३ दिवस आधी
पाणी दिल्यास काढणी
करणे
सोपे जाते आणि
पाने ताजी राहतात.
काढणीनंतर मेथीच्या योग्य
आकाराच्या जुड्या बांधून कापडात
किंवा जाळीदार पिशव्यांमध्ये
अथवा बांबूच्या टोपल्यांमध्ये जुड्या
व्यवस्थित रचून बाजारात
विक्रीसाठी
पाठवाव्यात. मेथीच्या जुड्या तुडवल्या
जाणार नाही याची
काळजी घ्यावी. तसेच काढणी
संध्याकाळी करावी म्हणजे ताजी
भाजी बाजारपेठेत पाठवता येते.
मुळांना जास्त माती असल्यास
मुळे
पाण्यात धुऊन झटकून
घ्यावीत, म्हणजे भाजी सडत
नाही. मेथीची
काढणी आणि विक्री
यामध्ये कमीत कमी
कालावधी असावा.
मेथीचे उत्पादन काढणीच्या पद्धतीनुसार
दर हेक्टरी
७ ते ८
टन इतके
मिळते. कसुरी मेथीचे उत्पादन
दर हेक्टरी
९ ते १०
टन इतके मिळते.
9403184752
शेतकरी । फेब्रुवारी
। २०२० ।
१५
No comments:
Post a Comment