ढेमसे व तोंडली लागवड तंत्रज्ञान


ढेमसे तोंडली लागवड तंत्रज्ञान
डॉ. अरविंद सोनकांबळे, विभाग प्रमुख, श्री. अनुराग जावरकर, आचार्य स्नातक, श्री. विशाल तायडे, भाजीपाला शास्त्रविभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

ढेमसे-
 ही उन्हाळ्यातील लोकप्रिय फळभाजी आहे. या काळात
बाजारात भाज्यांची आवक कमी असते तेव्हा निवडक भाज्या
असतात, त्यावेळी ही भाजी ग्राहकांच्या पसंतीची असते. ढेमसे या भाजीत
आणि '' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय लोह,
कॅल्शियम, स्फुरद असते.

 जमीन : सर्वसाधारणपणे हलकी ते मध्यम काळ्या जमिनीत ढेमसे या
पिकाची लागवड केली जाते. चांगला निचरा होणारी जमीन या पिकास
चांगली मानवते.

हवामान : कोरडे उष्ण हवामान या पिकास चांगला प्रतिसाद देते.
अति उष्ण किंवा दमट हवामान या पिकास मानवत नाही.

जाती : या पिकाचे अर्का टिन्डा, टिन्डा एस -४८३, अर्का अन्नामलाई
या सुधारित जाती आहेत.

बियाणे : हेक्टरी ते किलो बी पुरेसे होते. ह्या बियाचे कवच
कडक असल्याने उगवण फार कमी होते. त्यासाठी लि. पाणी गरम
(कोमट) करून किलो बी रात्रभर भिजत ठेवावे. नंतर सावलीत
सुकवून लावावे. लागवडीपूर्वी कार्बेन्डेझीम या बुरशीनाशकाच्या
द्रावणात बियाणे बुडवून लावावे.

लागवड : ढेमशाची लागवड पावसाळ्यात जून-जुलै महिन्यात
उन्हाळ्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करतात. लागवडीचे अंतर
दोन ओळीमध्ये मीटर वेलीतील अंतर मीटर ठेवावे.

 खते : लागवडीपूर्वी २५:२५:२५ किलो नत्र, स्फुरद पालाश प्रति
हेक्टरी ३० दिवसांनी २५ किलो नत्र प्रतिहेक्टर बांगडी पद्धतीने
द्यावी.

 पाणी : उन्हाळ्यात ते दिवसाच्या अंतराने सकाळी च्या आत
पाणी द्यावे. थंडीत ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फळे
लागल्यावर मात्र (तोडे चालू असताना) पाण्याच्या पाळ्या लवकर
द्याव्यात.

आंतरमशागत : पिकाच्या चांगल्या वाढीकरिता शेत तणमुक्त
ठेवण्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

संप्रेरकांचा वापर : या पिकामध्ये नर आणि मादी फुले एकाच वेलीवर
वेगवेगळी येतात. नर फुले अगोदर आणि अधिक संख्येने येतात.
फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी मादी फुलांचे प्रमाण वाढविणे गरजेचे
असते. यासाठी वेल दोन पानांवर असताना एन... १०० किंवा
जिब्रेलिक एसिड १० ते २५ किंवा इथ्रेल २५० पी.पी. एम. यांची
फवारणी केल्याने आणि यांचीच फवारणी परत आठ दिवसांनी पीक
चार पानांवर असताना दिल्याने मादी फुलांचे प्रमाण वाढून उत्पादन
लवकर जास्त येते.

कीड रोग व्यवस्थापन : ढेमसे या पिकावर लाल भुंगे, फळमाशी
या किडींचा भुरी आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
या किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली.
१० लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. बुरशीजन्य रोगाच्या
नियंत्रणाकरिता मॅन्कोझेब २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात घेऊन फवारावे.

तोडणी : साधारण 0 ते ४५ दिवसात फुलकळी लागते ५५ ते ६०
दिवसांनी तोडणी सुरू होते. ढेमशाची तोडणी फळे कोवळी लुसलुशीत
फळावर बारीक लव असताना करावी. फळे काढताना साल नखाने
दाबून पाहावी. फळे मोठी झाल्यास टणक आणि तंतुमय होतात. अशी
फळे भाजीसाठी उपयुक् राहत नाहीत. फळधारणेपासून साधारणपणे
ते १० दिवसांच्या अंतराने फळे काढावीत. फळे काढल्यानंतर रोगट
किडकी फळे बाजूला काढून चांगली फळे व्यवस्थित पॅकिंग करून
विक्रीसाठी पाठवावीत.
फळे कोवळी असल्यास बाजारात चांगला भाव मिळतो. फळे मोठी
झाल्यावर वजन वाढते. परंतु फळे कडक बनतात चवीला सपक
लागतात, त्यामुळे भाव कमी मिळतो. त्यासाठी वेळेवर तोडणी करणे
फायद्याचे ठरते.

उत्पादन : हेक्टरी सरासरी १५ ते २० टन उत्पादन मिळते.

तोंडली लागवड

महाराष्ट्रामध्ये तोंडलीची लागवड जवळ-जवळ सर्वत्र आढळते. तोंडली
हे वेलवर्गीय बहुवर्षीय भाजीपाला पीक आहे. या पिकापासून ते वर्षे
फळे मिळतात. शहरी भागामध्ये तोंडलीला भरपूर मागणी असते. बाजारभाव
चांगला मिळत असल्यामुळे तसेच फळे टिकाऊ आणि वाहतुकीस चांगली
असल्याने तोंडलीच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
भारतामध्ये तोंडलीची लागवड कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू,
बंगाल, आसाम, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते, महाराष्ट्रात तोंडलीची लागवड प्रामुख्याने ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये केली जाते.
तोंडलीची फळे बीटा-कॅरोटिनचे उत्तम स्रोत आहेत. याखेरीज त्यात
आणि '' जीवनसत्त्वे असतात. कडू तोंडले आयुर्वेदात कफ,
पित्तदोषावर उपचारांसाठी वापरले जाते. गोड तोंडले भाजीसाठी लागवडीत
आणतात. पानांचा वापर त्वचेचे विकार श्वासविकार यांवर केला जातो.
फळे कावीळ, कुष्ठरोग पंडुरोगावर गुणकारी आहेत. तोंडलीच्या कोवळ्या
फळांचा उपयोग भाजी, लोणचे, सांबर तयार करण्यासाठी केला जातो.

हवामान : तोंडली पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते.
भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या कमी अगर जास्त पावसाच्या भागात
तोंडलीचे पीक चांगले येते. अति थंडीचा तोंडली पिकाच्या वाढीवर
वाईट परिणाम होतो. तसेच अति पावसाचादेखील उत्पादनावर
विपरीत परिणाम होतो. असे असले तरी तोंडली एक चिवट पीक
असून प्रतिकूल परिस्थितीतही अधिक फळे देण्याची क्षमता या
पिकामध्ये आहे. समुद्रकाठची खारी हवा या पिकाला मानवते त्यामुळे
महाराष्ट्रातील कोकण विभागात तोंडलीचे पीक चांगले येते.

जमीन : तोंडली पिकाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम
काळी, पोयटा मिश्रित, रेताड गाळाची जमीन चांगली मानवते. पाणी
साठून राहणाऱ्या जमिनीत तोंडली पिकाची वाढ चांगली होत नाही.

 लागवड : तोंडली या पिकाची फाटेकलमापासून लागवड करतात.
साधारण सहा महिने ते एक वर्ष वयाच्या पेन्सिल एवढ्या जाडीच्या फांद्यांचे
३० ते ४५ सें.मी. लांबीचे कटिंग लागवडीसाठी निवडावे. शेतात
मादी नर रोपांची संख्या १०: च्या प्रमाणात असावी. तोंडली
या पिकामध्ये एकलिंगी फुले असतात तर काही द्रिलिंगी प्रकारही
आढळतात. तोंडलीची लागवड > मी. किंवा . >
. मी. अंतरावर करावी. तोंडलीचे वेल बांबूच्या आधाराने मांडवावर
चढवावेत. बियाणे लागवडीकरिता ते किलो बियाणे प्रति हेक्टरी
लागते.

 आंतरमशागत :
पिकाच्या चांगल्या वाढीकरिता शेत तणमुक्त
ठेवण्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

जाती : तोंडलीच्या घोलवड स्थानिक अलिबाग स्थानिक या जाती
आहेत. वाराणसी येथील भाजीपाला पिके संशोधन संस्थेने गोल किंवा
अंडाकार आणि लांबट आकारातच अशा तोंडलीचे व्ही.आर.के.-२०,
व्ही. आर.के.-३१, व्ही.आर.के.-३५ वाण विकसित केले आहेत.

खत व्यवस्थापन : २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति
हेक्टरी टाकावे. लागवडीपूर्वी २५:२५:२५ किलो नत्र, स्फुरद
पालाश प्रति हेक्टरी ३० दिवसांनी २५ किलो नत्र प्रति हेक्टर
बांगडी पद्धतीने द्यावी.

काढणी : फळाची काढणी कोवळी असतानाच करावी.
 उत्पादन : सरासरी १५ ते २० टन उत्पादन प्रति हेक्टरी येते.

संपर्क : ९६५७७२५८५७

शेतकरी फेब्रुवारी २०२० | ३५
माहिती पान१    पान२

No comments:

Post a Comment