जिवाणू खते


पीक उत्पादन वृद्धीसाठी जिवाणू खते

डॉ. अनिल . गायकवाड, कृषि अणुजीवशास्त्रज्ञ, नत्र स्थिरीकरण योजना, कृषि महाविद्यालय, पुणे

जमिनी सुपीकता टिकवण्यासाठी आणि तिचा कस राखून ठेवण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे खतांचा वापर. सर्वसाधारण त्यासाठी रासायनिक खते, सेंद्रिय खते, पिकांचे शेष भाग, काडीकचराकंपोस्ट करता येणारा सेंद्रिय पदार्थ जिवाणू खते यांचा वापर उचित ठरतो. खतामुळे जमिनी कसदार बनतात आणि त्यामुळे पिकांची उत्तम वाढ होते. जिवाणू खतामध्ये अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, असिटोबॅक््टररायझोबियम, निळे-हिरवे शेवाळ, अझोला इत्यादींचा समावेश होतो.
जिवाणू खते ही नैसर्गिक खते म्हणून ओळखली जात असून ती कमी खर्चाची असून त्यांचा पूरक खते म्हणून उपयोग होतो. जिवाणू खतांची तीन गटात विभागणी करण्यात आली आहे.
) नत्र स्थिरीकरण करणारी जिवाणू खते
) अँझोटोबॅक्टर: हे हवेतील मुक् नत्र शोषून घेतात पिकांना उपलब्ध
करून देतात. अँझोटोबॅक्टर जिवाणू प्रामुख्याने वातावरणातील
हवेतील विपुल प्रमाणात (७८ टक्के) मुक् स्वरूपात असणारा जो
नत्रवायू असतो तो स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध करून देतात.
हे जिवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल, तृणधान्य
पिकांना उपयोगी पडते. उदा. ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका,
कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा .
) अझोस्पिरिलम : हे जिवाणू अधिक कार्यक्षम असून ते अँझोटोबॅक्टरपेक्षा
दुप्पट प्रमाणात हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात.
अझोस्पिरिलम जिवाणू हे ऊस, ज्वारी, मका, बाजरी, गहू अशा सर्व
एकदल वनस्पती तसेच पालेभाज्या, फळभाज्या, फळझाडे ह्यांच्या
मुळांमध्ये, मुळांभोवतीच्या परिसरात, तसेच मातीत राहून नत्र स्थिर
करण्याचे कार्य करतात.
रायझोबियम जिवाणूचे सात गट त्या गटात येणारी पिके
चवळी गट -चवळी, भुईमूग, तूर, वाल,
मूग, उडीद, मटकी, ताग,
धेंचा .
हरभरा गट- हरभरा
वाटाणा गट- वाटाणा, मसूर
घेवडा गट- फ्रेंच बिन, लिईमा बिन,
श्रावणी घेवडा, सर्व प्रकारचा
घेवडा
अल्फाल्फा गट- मेथी, लसूनघास
बरसीम गट -बरसीम घास
) अँसिटोबॅक्टर : अँसिटोबॅक्टर जिवाणू हे ऊस शर्करायुक् पिके
उदा. मका, ज्वारी, बीट, इत्यादीमध्ये सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर
करते. ऊस इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्रारे हे जिवाणू प्रवेश
करून नत्राचे स्थिरीकरण करतात. अँसिटोबॅक्टर जिवाणू ऊस पिकास
५० टक्के नत्राचा पुरवठा करतात.
रायझोबियम : हे जिवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण
करतात. हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळांवाटे पिकास उपलब्ध
करून देतात. रायझोबियम जिवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना
उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळ्या
गटातील पिकांना विशिष्ट प्रकाराच्या रायझोबियम गटाचे जिवाणू खत
वापरावे. एका हंगामामध्ये शेंगवर्गीय (द्रिदल) पिकाकडून हेक्टरी
५४ ते १४० कि.ग्रॅ./हे. नत्र स्थिर केला जातो.
 निळे हिरवे शेवाळ : भात पिकांमध्ये निळे हिरवे शेवाळाचा वापर
करतात कारण भात खाचरामध्ये भरपूर पाणी असते; त्यामुळे
शेवाळाची वाढ चांगली होते. हे हवेतील वायुरूपी नत्र स्थिर करून
भात पिकास पुरविते. रासायनिक नत्रखताची २५ टक्के बचत होते.
अझोला : अझोला ही एक नेचेवर्गीय पाणवनस्पती असून हे एक
हिरवळीचे खत म्हणून वापरतात. अझोला हे अनाबेना अझोला या
निळ्या हिरव्या शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील
मुक् नत्र स्थिर करते. अझोलाचा उपयोग भात शेतीमध्ये केला
जातो.



) स्फुरद विरघळविणारे जैविक खत
पिकांच्या वाढीसाठी नत्राच्या खालोखाल स्फुरदाची आवश्यकता
असून ते पिकांच्या प्रमुख अन्नद्रव्यांपैकी एक आहे. रासायनिक खतांद्रारे
पुरविलेल्या स्फुरदापैकी बराचसा जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक
प्रक्रियांमुळे स्थिर होऊन तो पाण्यात विरघळणाऱ्या (घट्ट) स्वरूपात
परिवर्तित होतो. पिकांची मुळे मात्र पाण्यात विरघळणाऱ्या द्राव्य स्वरूपातील
स्फुरदच शोषून घेऊ शकतात. असा घट्ट स्वरूपातील स्फुरद विरघळवून
द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य स्फुरद विरघळविणारे सूक्ष्म जीव
करतात. बुरशी वाणातील अस्परजीलस अवामोरी आणि पेनिसिलीयम
डीजीटॅटम तर अणुजीव प्रकारातील बॅसिलस पॉलीमीक्झा, बॅसिलस
मेगाथेरियम आणि बॅसिलस स्ट्रायटा हे कार्यक्षम स्फुरद विरघळविणारे
सूक्ष्म जीव आहेत. स्फुरद जिवाणू खत वापरले असता अधिक प्रमाणात
स्फुरद शोषला जातो. पर्यायाने कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीतील
रायझोबियम जिवाणूंची कार्यक्षमता वाढून नत्रस्थिरीकरणाची क्रिया वाढते
पिकांना अधिकाधिक नत्रही उपलब्ध होतो. रासायनिक खतांद्रारे टाकलेला
स्फुरद कडधान्य पिकांना जास्तीत जास्त उपलब्ध केला जातो आणि
पर्यायाने रासायनिक स्फुरद खतांचा पुरेपूर उपयोग पिकांना होऊ शकतो.
पिके : ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी,
डाळिंब, पेरू, आंबा तसेच सर्व कडधान्य फुलझाडे .


) पालाश विरघळविणारे जिवाणू
जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्यांची मुबलकता असूनही स्थिर स्वरूपात
असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जिवाणू स्थिर स्वरूपातील
पालाशातून जैव रासायनिक क्रियांद्रारे पालाश मुकत करतात पिकाला
उपलब्ध करून देतात. पालाश या मूलद्रव्यांचे वहन होत नाही. हे जिवाणू
पालाशची वहन क्रियाही सक्रिय करतात. फ्राटेरिया ऑरैशिया हे जिवाणू
स्थिर स्वरूपातील पालाश जैव रासायनिक क्रियांद्रारे मुक् करतात.

उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी
कंपोस्ट सूक्ष्मजीव : शेतामध्ये मुबलक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ
उपलब्ध असतात; त्यापैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच
शेतात वापरता येतात. काहींना मात्र बरेच दिवस लागतात. शेतकरी
शेतामध्ये उसाचे पाचट, गव्हाचे काड, पालापाचोळा, पिकांची धाटे,
. बहुदा जाळून टाकतात. परंतु, त्यापासून जर कंपोस्ट खत तयार
केले तर जवळजवळ त्याच्या उपलब्धते एवढेच ओले कंपोस्ट खत
मिळते. हेच खत शेतात वापरले तर या खतांद्रारे पिकांनी शोषून
घेतलेल्या अन्नांशापैकी काही अन्नांश जमिनीत मिसळले जातात.
उसाचे पाचट, गव्हाचे काड यासारखे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास जरी
कठीण असले तरी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास कुजण्याची
क्रिया जलद होते अन्नद्रव्ययुक् कंपोस्ट खत तयार होते.
सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून कंपोष्ट खत तयार करणारे सूक्ष्मजीव
जेवढे अधिक कार्यक्षम तेवढी विघटनाची क्रिया जलद होते. म्हणून
प्रयोगशाळेत उपलब्ध पदार्थाचे विघटन करण्यात कार्यक्षम ठरलेलेच
सूक्ष्मजीव वापरावेत. हे सूक्ष्मजीव कंपोस्ट खत काडीकचऱ्याचे खडडे भरताना
एक किलो प्रति एक टन या प्रमाणात वापरावे. सूक्ष्मजिवांच्या वाढीसाठी
पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, म्हणून कंपोस्ट खडडे भरताना
नंतरही खड्ड्यातील पालापाचोळा, धसकटे . सर्व सेंद्रिय पदार्थावर
आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे जेणेकरून कुजणारा पालापाचोळा ओला
राहील, म्हणजे त्यामध्ये ५० ते ६० टक्के पाणी राहील. मात्र, खड्ड्यात
पाणी साठून राहील एवढे जादा पाणी टाकू नये. कारण आवश्यकतेपेक्षा
कमी किंवा जादा पाण्यामुळे कुजण्याची क्रिया मंदावते.
कंपोस्ट खडडे भरताना उसाचे पाचट, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरीचे
धाटे या बरोबर भुईमुगाचे वेल, सोयाबीन, मूग, हरभरा, उडीद, घेवडा यांचा पालापाचोळा वापरल्यास कुजण्याची क्रिया जलद होते. कुजण्यास
कठीण असणाऱ्या पदार्थाचे लहान लहान तुकडे केल्यास ते लवकर
कुजून कंपोस्ट खत जलद तयार होते. कंपोस्ट खड्डे भरताना जनावरांच्या
मलमूत्राचा उपलब्धतेनुसार वापर करावा.
उसाचे पाचट, गव्हाचे काड यापासून कंपोस्ट तयार करताना प्रति
टन ते किलो युरिया वापरणे आवश्यक आहे. या वापरलेल्या युरिया
खतामुळे सेंद्रिय पदार्थातील नत्राचे प्रमाण वाढते, कुजण्याची क्रिया जलद
होते पर्यायाने कंपोस्ट खतातील नत्राचे प्रमाणही वाढते. कंपोस्ट खड्डे
भरताना ते किलो सुपर फॉस्फेट किंवा किलो रॉक फॉस्फेट प्रति
टन सेंद्रिय पदार्थांबरोबर वापरल्यास कंपोस्ट खत लवकर तयार होते.
तयार होणाऱ्या कंपोस्ट खतात उपलब्ध कंपोस्ट स्फुरदाच्या प्रमाणातही
वाढ होते.
 जिवाणू खतांचे फायदे :
 जिवाणू खते सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचा
घटक असून पर्यावरणाचे संवर्धन होते. यांच्या वापरामुळे बियाणांची
चांगली लवकर उगवण होते. नत्र, स्फुरद इतर अन्नद्रव्यांची
उपलब्धता वाढून पिकांची जोमदार वाढ होते आणि पिकांची रोग
कीड प्रतिकारक शक्ती वाढते. रासायनिक खतांची २० ते २५ टक्के
मात्रा कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते पीक उत्पादनात वाढ
होते. १० ते १५ टक्क्याने जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो
आणि दुसडीच्या पिकांवर चांगला परिणाम होतो. जिरायत जमिनीत
जिवाणू खतांचा चांगला फायदा होतो.
जिवाणू खताचे बियाण्यांवर अंतरक्षिकरण : पाकिटातील जिवाणू
खत पुरेशा स्वच्छ पाण्यामध्ये मिसळून सर्व बियाण्यावर शिंपडून
एकसारखा लेप बसेल आणि बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही
अशा पद्धतीने लावावे. जिवाणू संवर्धन लावलेले बियाणे सावलीत
स्वच्छ कागदावर पसरून सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी.
याशिवाय जिवाणू खताचे रोपांच्या मुळांवर अंतरक्षिकरण, उसाच्या
कांड्यावर किंवा बटाट्याच्या बेण्यावर तसेच शेतात मातीत मिसळूनही
जिवाणू खतांचा वापर करता येतो.   संपर्क : ९४२०४९८८११   शेतकरी फेब्रुवारी २०२० | ३९

मूळ माहिती - पान१     पान२

No comments:

Post a Comment