कापूस वेचणीनंतर ट्रॅक्टरचलित
श्रेडरचा वापर
डॉ. स्मिता. एन. सोलंकी,
विभागप्रमुख कृषि यंत्र
व शक्ती,
डॉ. राहुल रामटेके,
विभागप्रमुख, विद्युत व इतर
ऊर्जा, कृअम,
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी
शेतात मजूर टंचाई
लक्षात घेता विविध
कामे करण्याकरिता
सुधारित यंत्रांची निर्मिती करण्यात
आली आहे. त्यामुळे
वेळ, श्रम
आणि आर्थिक बचत होते.
कापूस वेचणीनंतर शेतकरी
पऱ्हाट्याचे नियोजन
पारंपरिक पद्धतीने करतात, ज्यामुळे
पऱ्हाटी काढणे, गोळा करणे
ही
प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चीक
आहे. त्यामुळे या
कामासाठी सुधारीत
यंत्राचा वापर करणे
गरजेचे आहे.
पऱ्हाटी काढण्याच्या पारंपरिक पद्धती
व तोटे
मजुरांच्या सहाय्याने पऱ्हाटी
उपटणे, कापणे, गोळा करणे
व जाळणे.
नांगराच्या सहाय्याने पऱ्हाटी
काढणे, गोळा करणे
व जाळणे.
पारंपरिक पद्धतीचे तोटे
अत्यंत खर्चीक
जास्त मजुरांचा वापर व
वेळखाऊ प्रक्रिया
पऱ्हाटी जाळल्याने वातावरणात प्रदूषण
असुरक्षित
जैव इंधनाचे मोठ्या प्रमाणावर
नुकसान
उपाय
मोबाईल श्रेडरचा वापर
मोबाईल श्रेडर हे पुढील
पीक शेतात जलद
गतीने साफ करण्यासाठी
पिकांचे देठ कापण्यासाठी
आणि तोडण्यासाठी एका
ट्रॅक््टरवर चालणारे कृषि
उपकरण आहे. कपाशी,
एरंड, मका, तूर
आणि इतर तत्सम
पिकांसाठी
योग्य. ड्युअल क्लचसह कोणत्याही
४० एच.पी.
आणि त्याहून अधिक
एच.पी. ट्रॅक््टरद्रारे मशीन चालविली
जाऊ शकते. हे
मशीन ३ पॉइंट
लिंकेजला जोडलेले आहे आणि
पीटीओद्रारे ड्राइव्ह शाफ्टद्रारे ५४०/१०००
आरपीएफद्रारे
समर्थीत आहे. मोबाईल
श्रेडर हे पिकाचे
अवशेष, हिरवा
चारा आणि कापसाचे
देठ बारीक कापून/तुकडे करून १.५ ते
३ टन/
तासाने सहजपणे फेकू शकतो.
पारंपरिक पद्धतीच्या तुलनेने ७५
टक्के खर्चाची बचत
होते. श्रेड केलेले
पिकाचे अवशेष शेतात पसरले
जाऊ शकते किंवा
ट्रॉलीमध्ये गोळा करता
येते.
हे यंत्र ट्रॅक्टर ३
पॉइंट इंटरलिंकेजला जोडले
जाते. पी.टी.ओ. च्या
साह्याने फिरवले जाते.
एका वेळेस
एक पऱ्हाट्याची ओळ
जमिनीपासून जवळपास ५ सें.मी.
पर्यंत तोडली जाते. त्यानंतर
त्याची कुट्टी करून ब्लोअरच्या
साह्याने
मागे जमिनीवर फेकली जाते.
केलेली कुट्टी यंत्राला मागे
ट्रॉली जोडून
गोळा करता येते.
वैशिष्ट्ये
अतिशय सोपे, जलद व
कार्यक्षम यंत्र
वेळ, श्रम आणि
पैशात बचत
भाडेतत्त्वावर
अधिक उपयोगी कार्यक्षम
यंत्र
चारा बारीक करण्यासाठी सुध्दा
वापर
पऱ्हाट्याची
कुट्टी आच्छादनासाठी उपयोगी
कडबा कुट्टीसाठी उपयोगी
कपाशी, हत्ती घास (गिन्नी
गवत), मका, बाजरी
व उभी ज्वारी.
पिकाच्या अवशेषाचे तुकडे करण्यासाठी
उपयुक्त
कुट्टी केलेला भुसा हा
थेट शेतात टाकता
येतो किंवा
ट्रॉलीमध्ये
गोळा करू शकतो.
मशीनद्रारे
जमिनीवर पडलेल्या भुसा लवकरात
लवकर कंपोस्ट
खतामध्ये रूपांतर करता येतो.
त्यामुळे जमिनीची सुपीकता व
पाणी
शोषून घेण्याची क्षमता वाढते.
गोळा केलेला भुसा औद्योगिक
क्षेत्रामध्ये उपयोगी पडतो व
त्यामुळे हा
भुसा शेतकऱ्यासाठी पैसा मिळवण्याचे
माध्यम बनते.
४० एच.पी.
च्या वरच्या ट्रॅक्टरला
चालणारे.
श्रेडर मशीन प्रति
तास एक एकर
पऱ्हाटीचे तुकडे करून त्याचा
भुसा
जमिनीमध्ये
टाकते किंवा गोळा
करते.
संपर्क : ८००७७५२५२६
No comments:
Post a Comment