अळू लागवड तंत्रज्ञान

अळू लागवड तंत्रज्ञान
 
डॉ. मधुकर भालेकर, प्रा. धनश्री पाटील, डॉ. शिल्पा गायकवाड, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प,
भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी
 
अः गळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे.
 
भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक
घेतले जाते. उत्तर भारतात अळूच्या कंदांना आरवी असे म्हणतात. अळू या
भाजीपाला पिकाचे उगमस्थान भारत-मलाया यांमधील प्रदेश असून तेथून
त्याचा प्रसार आग्नेय आशिया, चीन, जपान आणि पॅसिफिक बेटात झाला.
कोकणातील नारळ आणि सुपारीच्या बागेत तसेच परसबागेत आळूच्या
लागवडीस बराच वाव आहे. अळूची पाने आणि कंद ही दोन्ही आहारदृष्ट्या
पौष्टिक आहेत. अळूची पाने आणि कंद यांमध्ये कार्बोहायड्रेटस, फॅटस,
खनिजे तसेच जीवनसत्त्व '' आणिभरपूर प्रमाणात असते.
 
अळूचे कंद, पाने आणि देठ यांचा उपयोग भाजीसाठी केला जातो.
अळूच्या पानांपासून वड्या आणि भाजी तयार करतात. अळूच्या
कंदापासून चिप्स तयार करता येतात. अळूची पाने आणि कंद यांमध्ये
असलेल्या कॅल्शियम ऑक्झिलेट रॅफाईड्स या द्रव्यांमुळे अळू खाताना
घसा खवखवतो. परंतु अळू शिजवताना चिंचेचा वापर केल्यास ही द्रव्ये
कमी होतात. त्यामुळे घसा खवखवण्याचे प्रमाण कमी होते. अळूचे
कंद आणि पाने यांतील प्रोटिन्समुळे कोणत्याही प्रकारची अँलर्जी होत
नसल्यामुळे अळूपासून बनविलेले अन्नपदार्थ लहान मुले, आजारी आणि
अशक्त व्यक्तींसाठी उपयुक् आहेत.
हवामान आणि जमीन : अळूला उष्ण आणि दमट हवामान मानवते.
 
कडाक्याच्या थंडीत अळूची वाढ खुंटते. अळूच्या लागवडीसाठी
सरासरी २१ अंश सें.ग्रे. तापमान असावे. रेताड आणि भुसभुशीत
जमिनीत अळू चांगला फोफावतो. अळूच्या योग्य वाढीसाठी जमिनीचा
आम्ल विम्ल निर्देशांक . ते . इतका असावा.
प्रमुख जाती : अळूच्या स्थानिक जातींची लागवड बऱ्याच ठिकाणी
केली जाते. उत्तर भारतात फैजाबादी, लहारा, बन्सी, देशी बंडा
या स्थानिक जाती लोकप्रिय आहेत. तर महाराष्ट्रात काळ्या देठाचा
लहान ते मध्यम पानांचा अळू चांगला समजला जातो. पंजाबमध्ये
एस-, एस-११ या जातींची लागवड केली जाते. अळूची व्यापारी
तत्त्वावर लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या अळूच्या जाती
संशोधन करून विकसित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सी-,
सी-१३५, सी-१४९, सी-२६६ तसेच पंचमुखी आणि सहतस्त्रमुखी
या जाती त्यांच्या कंदाची आणि पानांची भाजी करण्यासाठी वापरतात.
तर महाराष्ट्रात दापोली- ही जात अळूच्या पानांपासून वड्या तयार
करण्यासाठी वापरतात.
कोकण हरितपर्णी : ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि
विद्यापीठ दापोली येथून प्रसारित करण्यात आलेली आहे. भरपूर
उत्पादन, अधिक हिरवी पाने  कंद, देणारा हा वाण आहे. जांभळ्या
रंगाची छटा असलेली गर्द हिरवी पाने हे या वाणाचे वैशिष्ट्ये आहे. या
वाणाचे सरासरी हेक्टरी उत्पादन  ते  टन आहे.
हंगाम आणि लागवड पद्धती : पाण्याची सोय असल्यास जवळ-
जवळ वर्षभर अळूचे पीक घेता येते. अळूची उन्हाळी हंगामातील
लागवड फेब्रुवारी-मार्च महिन्यात तर खरिपातील लागवड जून-जुले
महिन्यात करतात.
अळूच्या पिकासाठी जमीन साधारणत : १५ ते २० सें.मी. खोल
नांगरून भुसभुशीत करावी. दर हेक्टरी १० ते १५ टन शेणखत किंवा
कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावे. अळूची लागवड सरी वरंबा किंवा
सपाट वाफ्यांमध्ये करतात. अळूच्या लागवडीसाठी मातृकंद अथवा
बगलकंद ही वापरले जातात. मात्र, लागवडीसाठी बगलकंदाचा वापर
केल्यास उत्पादन जास्त येते. लागवडीसाठी लागणाऱ्या कंदाचे वजन
साधारणपणे ४५ ते ५० ग्रॅम असावे. अशा रीतीने एक हेक्टर क्षेत्रासाठी
सुमारे  ते १० किंवटल कंद लागतात. कंदासाठीच्या अळूची लागवड
करताना दोन ओळीतील अंतर 0 सें.मी. ठेवावे तर वड्या तयार
करण्यासाठी लावल्या जाणाऱ्या अळूच्या जातींची लागवड ६० > ६०
सें.मी. अंतरावर करावी. अळूच्या पानांसाठी लागवड सपाट वाफ्यात
करणे जास्त चांगले असते.
 
खते आणि पाणी व्यवस्थापन : भरपूर उत्पादन येण्यासाठी अळूला
दर हेक्टरी १०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि ५० किलो
पालाश द्यावे. स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि अर्धी मात्रा
लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी द्यावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे
उन्हाळी हंगामात सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खरीप हंगामात
पुरेसा पाऊस असल्यास पाणी देण्याची आवश्यकता नसते.
 
आंतरमशागत : पानांसाठी अळूची लागवड केल्यास फारशी मशागत
करावी लागत नाही. कारण तेथे सतत ओलावा असल्यामुळे सहसा
तण उगवत नाही. कंदासाठी लागवड केल्यास आवश्यकतेनुसार एक
आणि दोन महिन्यांनी खुरपण्या करून रोपांना मातीची भर द्यावी.
त्यामुळे कंद चांगले पोसतात. फुटवे जास्त निघालेले असल्यास  ते
 मुख्य पाने ठेवून बाकीची पाने कापून टाकावीत.
 
 महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : पाने कुरतडणारी आणि
मावा या किडी अळूच्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पिकाचे
मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
 
 उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लीटर पाण्यात १५ मि.ली.
डायमिथोएट मिसळून फवारावे   टक्के निंबोळी अर्काची फवारणी
करावी.
 
महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण
 
१)      करपा लिफ ब्लाईट : हा रोग बुरशीमुळे होतो. त्यामुळे पाने आणि अळी देठावर चट्टे पडतात. चट्टे
हळूहळू मोठे होत जाऊन संपूर्ण पानावर पसरतात. त्यामुळे पाने
करपल्यासारखी दिसतात. नंतर पाने सुकून गळून पडतात.
 
उपाय : रोगट पाने काढून नष्ट करावीत. २५ ग्रॅम झायनेब पाण्यात
मिसळणारी भुकटी १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
 
) पिथियम रॉट : हा रोग पिथियम या जमिनीत वाढणाऱ्या बुरशीमुळे
पसरतो. बुरशीचा प्रादुर्भाव झाडाच्या मुळांवर आणि कंदावर होतो.
त्यामुळे कंद सुरवातीला मऊ पडतात आणि नंतर कुजतात. झाडाची
पाने निस्तेज आणि मलूल होतात. कालांतराने झाड मरते.
उपाय : अळूची बाग स्वच्छ ठेवावी. पिकांची फेरपालट करावी.
लागवडीनंतर रोगमुक् मातृकंद अथवा बगलकंद वापरावेत.
 
 काढणी  उत्पादन : लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांत पानांची
कापणी करता येते. पूर्ण वाढलेली पाने जमिनीलगत देठासह कापून
त्यांच्या गड्या बांधतात. एकदा केलेल्या लागवडीपासून दीड ते दोन
वर्षे पाने मिळतात. कंदासाठी लावलेले पीक सुमारे ९० ते १००
दिवसांत तयार होते. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडून
सुकू लागतात. पाने पिवळी पडू लागल्यानंतर कुदळीने खणून काढून
घ्यावेत. काढणीनंतर हे कंद  ते  दिवस सावलीत पसरून त्यांची
पालटणी करतात. त्याच वेळी खराब, कुजलेले कंद काढून टाकावेत.
अशा प्रकारे योग्य काळजी घेतल्यास वडीसाठी अळूच्या जातीपासून
सुमारे  ते  टन दर हेक्टरी हिरवी पाने आणि कंदासाठी लावण्यात
येणाऱ्या जातीपासून सुमारे १० टन दर हेक्टरी कंद एवढे उत्पादन
मिळते.
अळूच्या निरनिराळ्या उपयोगामुळे या पिकाला वर्षभर मागणी असते.
अळूच्या काही विशिष्ट जातीच्या पानांपासून अत्यंत चविष्ट प्रकारच्या
वड्या खाण्यासाठी तयार करता येतात. अशा वड्यांच्या पानांना
शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समधून मागणी आहे. कंदासाठी स्वतंत्र
पीक म्हणून अळूची उत्तर भारतात व्यापारी तत्त्वावर लागवड केली
जाते. अशा प्रकारे अळू या पिकाचे पानांसाठी  कंदासाठी लागवड
करून शास्त्रीयदृष्ट्या योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन
मिळून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
 
संपर्क : ९४०३१८४७५२
 
शेतकरी  फेब्रुवारी  २०२० | १९
मूळ माहीती पान१ पान २


 

No comments:

Post a Comment