गहू
जमीन व हवामान-
बागायती गव्हास पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन निवडावी. थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तितके पीक वाढीस पोषक ठरून उत्पादनात वाढ होते. गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता थंडीचे किमान १०० दिवस मिळणे आवश्यक आहे.
बियाण्याचे प्रमाण-
कोरडवाहू - हेक्टरी ७५ किलो.
बागायती- हेक्टरी १०० किलो. एचडी-२१८९ किंवा पूर्णा यासारख्या जाड दाण्याच्या वाणांसाठी-हेक्टरी १२५ किलो. बागायती उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १५० किलो
बीज प्रक्रिया-
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा व्हीटावॅक्स ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २. ५ ग्राम प्रति किलो बियाण्यास लावल्यानंतर जिवाणू संवर्धक लावावे. ऍझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १०-१२ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे.
खते -
कोरडवाहू - प्रति हेक्टर ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.
बागायती वेळेवर पेरणीसाठी-
पेरणीचे वेळी -प्रति हेक्टर ५०-६० किलो नत्र, ५०-६० किलो स्फुरद व ५०-६० किलो पालाश.
पाण्याच्या पहिल्या पाळीचे वेळी (१८-२० दिवसानंतर)- ५०-६० किलो नत्र
बागायती उशिरा पेरणीसाठी - प्रति हेक्टर ४०किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश
पाण्याच्या पहिल्या पाळीचे वेळी (१८-२० दिवसानंतर)- ४० किलो नत्र
पेरणी-
कोरडवाहू -ऑकटोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात
बागायती- नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात
पेरणीस उशीर झाल्यास १५ डिसेंबर पर्यंत पेरणी करून हि बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते.
कोरडवाहू व बागायती पेरणीसाठी दोन ओळीत २३ से.मी. अंतर तर बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीत १५ किंवा १८ सेमी अंतर ठेवावे. बियाणे ५ ते ६ सेमी पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
तणनाशके-
अरुंद पानी तणांसाठी- २-४डी (सोडियम साल्ट) प्रति हेक्टरी १ किलो क्रियाशील मूलद्रव्य ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणी नंतर २५-३० दिवसांनी फवारणी करावी.
रुंद पानी तणांसाठी- अलग्रीप (मेटसल्फ्युरान मिथाईल )प्रति हेक्टरी ४ ग्रॅम क्रियाशील घटक किंवा २० ग्रॅम औषधाची ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणी नंतर २५-३० दिवसांनी फवारणी करावी.
गव्हाचे वाण -
कोरडवाहू-
एकेडीडब्ल्यू २९९७-१६ (शरद) कालावधी -११०-११५ उत्पादन १२-१४ क्विंटल /हेक्टर
पिडिकेव्ही वाशीम (डब्ल्यूएसएम-१४७२) कालावधी -१००-११० उत्पादन १४-१५ क्विंटल /हेक्टर
एमसीएस १९६७ कालावधी -१०५-११० उत्पादन ८-१० क्विंटल /हेक्टर
एनआय ५४३९ कालावधी -१०५-११० उत्पादन १०-१२ क्विंटल /हेक्टर
मर्यादित ओलीत -
पिडिकेव्ही वाशीम (डब्ल्यूएसएम-१४७२) कालावधी -११५-११७ उत्पादन २०-२५ क्विंटल /हेक्टर
बागायती वेळेवर पेरणी-
एकेडब्ल्यू १०७१ (पूर्णा ) कालावधी -११०-११५ उत्पादन ३०-३५ क्विंटल /हेक्टर
एकेएडब्ल्यू ३७२२ (विमल ) कालावधी -१०५-११० उत्पादन ४०-४२ क्विंटल /हेक्टर
एचडी २१८९ कालावधी -११०-११५ उत्पादन ३०-३५ क्विंटल /हेक्टर
एचडी २३८० कालावधी -१०५-११० उत्पादन ३०-३५ क्विंटल /हेक्टर
बागायती उशिरा पेरणी-
पिडिकेव्ही सरदार (एकेएडब्ल्यू ४२१०-६) कालावधी -९६-१०० उत्पादन ४२-४४ क्विंटल /हेक्टर
एकेएडब्ल्यू ४६२७ कालावधी -९२-९६ उत्पादन ४२-४४ क्विंटल /हेक्टर
एकेडब्ल्यू ३८१ कालावधी -९०-९५ उत्पादन २५-३० क्विंटल /हेक्टर
एकेडब्ल्यू १०७१ (पूर्णा ) कालावधी -१००-१०५ उत्पादन २५-३० क्विंटल /हेक्टर
एचआय ९७७ कालावधी -१००-१०५ उत्पादन २५-३० क्विंटल /हेक्टर
किडी व त्यांचे व्यवस्थापन-
१) खोडकिडा-
खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओंबीवर असताना आढळून येतो. अळ्या रोपट्याच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात, परिणामी रोपट्याचा वरील भाग वाळतो. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता १) जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन तापू दयावी जेणेकरून किडीचे कोष नष्ट होतील. २) पिकांची फेरपालट करावी. ३) पेरणी वेळेनुसार करावी. ४) रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. ५) पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. ६) या किडीच्या व्यवस्थापनाकरिता कुठलेही लेबल क्लेम रासायनिक कीटकनाशक उपलब्ध नाही.
२) मावा-
ही पिवळसर अथवा काळपट हिरवी तिळाच्या दाण्याचे आकाराची चिमुकली कीड असून या किडीचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात,त्यामुळे पाने पिवळसर रोगात बनतात. हि कीड विष्ठेद्वारे चिकट द्रव पानावर टाकत असल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळी पडतात व प्रकाश संश्लेषण बंद होऊन रोप मरते . या किडीच्या नियंत्रणासाठी थायमिथॉक्झॉम २५ टक्के डब्ल्यूजी १०-१५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी, ४० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) उंदीर-
उंदीर गव्हाचे फुटवे आणि ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी आमिष वापरावे. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडेतेल व १ भाग ब्रोमोडिऑलान ०. २५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर आमिष प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील बिळांमध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे.
रोग व त्यांचे व्यवस्थापन-
१) तांबेरा-
हा हवेद्वारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर / खोडावर व ओंब्यांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोड येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबेऱ्यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वाणांचा ( उदा. एचडी २१८९, पूर्णा , एकेडब्ल्यू ३८१, एचआय ९७७, एकेएडब्ल्यू ३७२२,एकेएडब्ल्यू ४६२७ ,एकेएडब्ल्यू ४२१०-६) वापर करावा. तांबेऱ्याची लागण दिसताच मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २०-२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा संयुक्त बुरशीनाशक कार्बाक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के डीएस ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा प्रकारे फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन १०-१५ दिवसाच्या अंतराने पुन्हा दुसरी फवारणी करावी.
२) काजळी किंवा काणी -
या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होतो. रोगट ओंब्यांमध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी संयुक्त बुरशीनाशक कार्बाक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के डीएस ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
३) पानावरील करपा-
मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २०-२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी अशा प्रकारची फवारणी करावी.
--//--
No comments:
Post a Comment