गांडूळ खत
शेती व शेतीपूरक विविध व्यवसायातून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुर्नवापर करण्याचा जास्तीत जास्त विचार हाेणे गरजेचे आहे. सेंद्रिय पदार्थाचा पुर्ण वापर हाेण्यासाठी त्याचे विघटन हाेणे आवश्यक आहे. या विघटनात जमिनीत निसर्गत: असणारे उपयुक्त जीवजंतु आणि गांडुळे यांचा सिंहाचा वाटा आहे. गांडुळाचा वापर सेंद्रिय शेतीत करुन निसर्गाचे चिरंतन स्वरुप टिकवण्यासाठी आणि शेतातुन दर्जेदार उत्पादन वाढवण्यासाठी गांडुळ खत निर्मिती आणि वापर हा शाश्वत उपाय हाेऊ शकताे.
गांडुळ खत निर्मि ती मध्ये प्रामुख्याने इसिनीया फोयटीडा नावाच्या गांडुळाचा वापर केला जाताे. या जातीच्या गांडुळाचे अंडीपुंज मुगाच्या आकाराचे असुन हिरवट पिवळसर रंगाचे असतात.
गांडुळ खत तयार करण्याच्या पध्दती-
१. शेड पध्दती
२. टाकी पध्दती
३. बिछाणा पध्दती.
शेड पध्दती -
शेडची लांबी - 110 फुट, रुंदी - 33 फुट, दिशा - दक्षिणाेत्तर.
चारही बाजुने 1 ते 1.5 फुट उंचीचे दगडी बांधकाम करावे.
त्याम ध्ये सिंमेंटचे लांबी मध्ये 13 खांब व रुंदी मध्ये 5 खांब असे 65 खांब पुर्व पश्चिम ढाळ ठेऊन ठेवावे. वर सिंमेंटचे पत्रे घालावेत.
शेड उभी करतांना दाेन खांबातील अंतर 9 फुट ठेवावे.
शेडची जमिन मु रमाने भरुन घेऊन चांगली धुमसुन घेऊन एका बाजूला नकळत उतार ठेवावा.
शेड तयार झाल्यावर अर्धवट कुजलेले शेणखत, तण, ग्लिरिसीडीया पाला वैगेरे कचऱ्याचा पहिला थर द्यावा. त्यावर ओला पाला टाकून दुसरा थर द्यावा.
त्यावर पुरेश्या प्रमाणात गांडुळ कल्चर वाफ्यावर पसरुन टाकावे. पाणी देण्याची व्यवस्था करावी.
साधारणपणे 45 ते 50 दिवसात गांडुळ खत तयार हाेईल.
पाणी बंद करुन सुकल्यावर वाळु चाळण्याच्या चाळणीने चाळुण घ्यावे. यानंतर पुन्हा गांडुळ खत तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे तळाशी 15 सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेले गव्हाचे काड, ऊसाचे पाचत, साेयाबीन काड, तूर व सुर्यफुल भुसा पालापाचाेळा, चाऱ्याचा उरलेल्या भाग आदिचा सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा.मात्र हे सारे पदार्थ अर्धवट कुजलेले असावे.
त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व त्यावर ग्लॅरिसिडीयाच्या पाल्याचा थर व परत अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर द्यावा.
यावर शेणाच्या रबडीचा 10 सेंमी चा थर द्यावा.
वातावरणानुसार पाणी द्यावे, खतात 50 टक्के ओलावा रहावा असे नियाेजन करावे.
खताचा रंग तपकिरी काळसर असताे
साधारणपणे अशा प्रकारच्या शेड मधुन 15 टन गांडुळ खत मि ळते. एका एकराकरिता 4 टन गांडूळ खत वापरावे.
टाकी पध्दती-
टाकीचे आकारमा न - 25 फुट लांब, 4 फु ट रुंद, व 2 फु ट खाेली.
टाकी पध्दतीच्या बेडचे बांधकाम करतेवेळी एका बाजुस 6 इंच उतार ठेवावा.
2 बेड मध्ये 1.6 फुट अंतर ठेवावे.
बेडचे काम पुर्ण झाल्यावर टाकीचा तळाचा भाग सिंमेंटने सपाटीकरण करुन घ्यावा.
त्यावर 3 इंच जाडीचा विटाच्या तुकड्यांचा थर द्यावा. तुकड्यांच्या फटीमध्ये बारीक रेती टाकावी. विटांच्या तुकड्यावर 90 टक्के शेडनेट अंथरावे. यावर पिव्हीसी पाईपला छिद्रे पाडुन त्याचे आऊटलेट
बाहेर काढावे जेणेकरुन हवा खेळती राहून गांडुळास प्राणवायु मिळेल. याप्रमाणे शेडचे काम पुर्ण झाल्यावर नेहमीप्रमा णे बेड भरुन घ्यावा.
अशा पध्दतीने 2 टन खत मिळते
बिछाणा पध्दती-
गांडुळ पैदास करण्यासाठी इसिनिया फोयटीडा या विदेशी जातीचा वापर करावा. गांडुळ खतावर दिवसभर सावली याप्रमाणे छप्पर असावे अशी रचना करावी. साधारणपणे 2000 गांडुळे प्रती खड्डा प्रमाणे साेडुन त्यापासून प्रजनन व गांडुळ खत निर्मीती करावी.
कृती
खत निर्मीती करीता जमिनीमध्ये 20 सेमी खाेल 1 मी लांब व 60 सेंमी खाेल खड्डा खाेदावा.
या खड्ड्यामध्ये अर्धे कुजलेले शेणखत व अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचाेळा भरुन खड्डा भरावा. या खड्ड्यात 2000 गांडुळे साेडावीत.
गांडुळे साेडल्यावर त्यावर गाेणपाटाचे आच्छादन करुन त्यावर दिवसातून तीन वेळा पाणी शिंपडावे. साधारणपणे 60 दिवसात गांडुळ खत तयार हाेते.
गांडुळ खत तयार झाल्यावर खत हाताने बाजुला करावे, काेणत्याही अवजाराचा वापर करु नये. यामु ळे गांडूळाना इजा हाेत नाही. पुर्ण वाढ झालेले गांडुळे वर नमुद केल्याप्रमा णे गादीवाफ्यावर साेडावे.
फायदे -
1. गांडुळामु ळे जमिनीचा पाेत सुधारताे, जमिनीची धुप फारच कमी हाेते, जमि नीचा सामु याेग्य राखला जाताे.
2. मातीच्या कणाच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जाताे.
3. गांडूळाची विष्ठा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे. याला ह्युमस असे म्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे स्फूरद पालाश व इतर सुक्ष्म द्रव्य झाडांना सहजासहजी उपलब्ध हाेतात.
4. जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहुन मुळाची वाढ चांगली हाेते.
5. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतिची बनवतात.
6. उपयुक्त जिवाणुच्या संख्येम ध्ये भरमसाठ वाढ हाेऊन वरखते व पाण्याच्या खर्चात बचत हाेते.
7. झाडांची सशक्त वाढ हाेऊन त्यांच्यात काही प्रमाणात किडींना व राेगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण हाेते.
घ्यावयाची काळजी -
बेडूक, साप, सरडे, पाली, पक्षी, काेंबड्या यांना गांडुळ खाण्यासाठी आवडतात. अशा वेळी शेड उभारताना प्रकल्पा शेजारी पक्षांचे स्थान असू नये किंवा त्यापासून गांडुळांचे संरक्षण करण्याची व्यवस्था करावी. पक्षी खताचा ढिग उकरुन गांडुळे खातात त्यामुळे शेड करणे आवश्यक आहे.
जनावरांच्या पायाखाली गांडूळे तुडवले जावून मरतात. त्यामुळे जनावरे प्रकल्पाजवळ भटकणार नाही याची काळजी घ्यावी.
गांडूळ खतासाठी उभारलेल्या काडी कचऱ्याच्या ढिगावर वाळवी, मुंग्या यांची लागण हाेऊ देऊ नये. तसेच ढिगावर पाण्याचे प्रमाण याेग्य राखावे.
उंदराचा प्रादुर्भाव हाेऊ देऊ नये.ते बेड उध्दवस्त करतात.
ढीग वरखाली करतांना हलक्या अवजाराचा वापर करावा जेणेकरुन गांडुळांना इजा हाेणार नाही.
ग़ांडुळे क्षारयुक्त पाणी व रासायनिक खतांना संवेदनक्षम आहेत म्हणून त्यांचा वापर टाळावा.
काेळी हा विशेषत: गांडुळांना फार उपद्रवी ठरताे. शेजारील शेतात काेळीचे नियंत्रण करावे.
इतर किटकांच्या नियंत्रणाकरीता बेडवरती बटाट्याचे तुकडे फेकावे किटक त्याभाेवती गाेळा झाल्यावर काढून घ्यावी.
वापरण्याचे प्रमा ण -
जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.6 टक्के वर असेल तर 2 टन गांडूळ खत प्रति एकर प्रति वर्ष वापरावे. जर प्रमाण कमी असेल तर गांडूळ खतासाेबत कंपाेस्ट, शेणखत पेंड यांची जाेड द्यावी.
जमिनी तयार करतांना पेरणीपूर्वी 8 ते 10 दिवस - 30 टक्के, मुळांनी जमिनीत जाेम धरल्यावर - 40 टक्के आणि पिक फुलावर येताना -30 टक्के मा त्रा द्यावी.
फळबागासाठी प्रती वर्ष 5 किलाे प्रति झाड गांडुळ खत दाेनदा विभाग़ून द्यावे.
स्रोत-शेतकरी मासिक एप्रिल २०२३
No comments:
Post a Comment