माती परीक्षण
खताच्या कार्यक्षम आणि समतोल वापरासाठी मृद चाचणी ही आवश्यक बाब आहे. जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचा साठा लक्षात घेऊन त्यानुसार खताचा वापर केला तर दिलेल्या खताचा योग्य मोबदला मिळू शकतो.
(१) प्रतिनिधिक मातीचा नमुना असा घ्यावा
अ) जमिनीची एकरुपता, रंग सुपीकता, उंच-सखलपणा इत्यादी लक्षात घेऊन वेगवेगळे गट पाडावेत.
ब) प्रत्येक गटातून ५-१० ठिकाणाहून २२.५ से.मी. खोलीपर्यंत गिरमीट, फावडे किंवा खुरपीच्यासाह्याने मातीचा नमुना घ्यावा. फळ पिकांसाठी एक मिटर खोलीपर्यंतची मातीचा नमुना घ्यावा.
क) फावडे किंवा खुरपीच्या साह्याने मातीचा नमुना घेतानां प्रत्येक ठिकाणी २२.५ से.मी. खोल “व्ही” आकाराचा खड्डा करावा. त्या तळापासून पृष्ठभागापर्यंत सारख्या जाडीचा मातीचा थर जमा करावा.
ड) सुमारे ५-१० ठिकाणाहून घेतलेले नमुने एकत्र मिसळावे / एकत्रित करावेत, त्यातून अंदाजे अर्धा ते एक कि.ग्रॅ. माती सावलीत सुकवून प्लॅस्टिकच्या अथवा कापडी पिशवीत भरावी.
(२) नमुना घेतानां हे लक्षात असू द्या
अ) मातीचा नमुना साधारणपणे पिकाची कापणी झाल्यावर, परंतु नांगरणीपुर्वी घ्यावा. शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा.
ब) विहिरी आणि बांधाच्या अथवा कालव्यालगतीची जागा, शेणखत व कचरा टाकण्याची जागा आणि जनावरांच्या गोठ्यालगतची जागा मातीच्या नमुन्याकरिता घेण्याचे टाळावे.
क) जमिनीत रासायनिक खते टाकली असल्यास दोन अडीच महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.
ड) विविध प्रकारच्या जमिनीचे अथवा निरनिराळ्या शेतातील नमुने एकत्र मिसळू नये.
इ) मातीचा नमुना घेण्यासाठी अथवा साठवण्यासाठी रासायनिक खताच्या पिशव्या वापरु नयेत.
ई) सुमारे ५-१० ठिकाणची माती एका प्रतिनिधिक नमुन्याकरिता एकजीव करणे अत्यंत आवश्यक आहे.
(३) मातीच्या नमुन्यासोबत खालील माहीत द्यावी.
(१) शेतकऱ्याचे पूर्ण नाव व पत्ता :
(२) सर्व्हे नंबर / गट क्रमांक :
(३) जमिनीचा प्रकार :
(४) ओलिताचे साधन :
(५) जमिनीचा प्रकार :
(६) शेती व्यवस्थापन कोरडवाहू / बागायती :
(७) जमिनीची खोली :
(८) जमिनीचा उतार :
(९) नमुना घेतल्याची तारीख :
(१०) मागील हंगामात घेतलेली पिके, वापरलेली खते आणि त्यांचे प्रमाण
(११) पुढील हंगामात घ्यावयाची पिके आणि त्यांचे वाण :
तक्ता क्र. १ : मृद परीक्षणावर आधारित गुणधर्म व त्याचे निर्धारण
वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे मृद परीक्षणामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण जमिनीमध्ये कमी आढळून आल्यास शिफारस केलेल्या खताच्या मात्रेपेक्षा २५ टक्यांनी वाढवुन खताची मात्रा पिकास द्यावी. जर तेच प्रमाण मध्यम आढळून आल्यास खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी व प्रमाण अधिक आढळून आल्यास शिफारशीपेक्षा २५ टक्क्यांनी खते पिकांना कमी द्यावीत.
मृद व उती / पाने तपासणीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची पातळी :
मृद परिक्षणात व उती / पाने तपासणीमध्ये खालील तक्त्यामध्ये दिलेल्या प्रमाणात अन्न्द्रव्यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. अन्यथा सूक्ष्म अन्न्द्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास त्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तक्ता क्र.२ :माती व पाने यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कमीत कमी प्रमाण (प्रतिदशलक्ष भाग/पीपीएम)
(४) मातीच्या नमुना परीक्षणासाठी कोठे पाठवावा
माती परीक्षण प्रयोगशाळा
अ) माती परीक्षण आणि पर्ण परीक्षण सेवा : खताच्या कार्यक्षम व समतोल वापरासाठी तसेच सर्व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण बघण्यासाठी मातीच्या परीक्षणासोबत उती व पर्णचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
.
Posted 27th July 2015 by VNMKV Tech
No comments:
Post a Comment