phospho compost PROM स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (फॉस्फो कंपाेस्ट)

 स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (फॉस्फो कंपाेस्ट) (PROM)


काेरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी 10 टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्या करीता उपलब्ध हाेत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो  कंपाेस्ट तयार करु शकताे. यात सर्वसाधारण शेणखताच्या तुलनेत नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा जास्त असते.

साहित्य :

आपल्या शेतावर उपलब्ध असलेल्या पिक अवशेष- जसे की गव्हाचा काडा, ऊसाचे पाचट, बाजरीचा भुगा, काेकणात उपलब्ध असलेला भाताचे काड किंवा तुर, साेयाबीन, हरभरा इ. पिक अवशेष. 

शेण, 

कुजविण्यासाठी कल्चर.

कृती :

१. लांबी- 9 ते 10 फूट , रुंदी - 5 ते 6 फूट व खाेली 2 फूट या आकारमानाचा खड्डा करुन घ्यावा.

२. त्यावर पाॅलीथिन किंवा कालबाह्य बॅनर (सहज व स्वस्त उपलब्ध असलेले) ह्या खड्ड्यामध्ये जमिनीच्या वर 1 फुटापर्यत अंथरुन घ्यावे.

३. यावर 4 ते 5 क्विंटल गव्हाचे काड, बाजरी, भात, ऊसाचे पाचट, तुर, साेयाबीन यांचे मिश्रण अथवा फक्त एकाच प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकावे.

४. यावर 100 ते 150 किलाे शेण टाकावे.

५. कुजविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर हाेण्याकरिता जवळच्या कृषि विद्यापीठात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या बुरशीचे मिश्रण की ज्यामध्ये ट्रायकाेडर्मा  पॅसीलाेमाइस फ्युझीस्पाेरस व अ‍ॅस्परजीलस अवमोरी इत्यादी असते हे 1 किलाे कल्चर वरील मिश्रणामध्ये टाकावे.

६. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यावेत.

७. उच्च प्रतीचा स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्यासाठी 100 ते 120 किलाे राॅक फॉस्फेट  (12 ते 20 टक्के पर्यंत) व 500 मिली  द्रवरुप किंवा 1 किलाे घनरुप स्फुरद विरघळविणारे जिवाणुंचे मिश्रण या सर्व तयार केलेल्या सेंद्रिय पदार्थ व शेणावर टाकुन पुन्हा मिसळून घ्यावे.

८. दर 15 दिवसांनी सर्व मिश्रण वर खाली करुन एकत्र मिसळून घ्यावे जेणेकरुन कुजण्याची प्रक्रिया एकसमान वेगाने हाेईल.

९. 90 दिवसानंतर चांगल्या प्रतिचे फॉस्फो कंपाेस्ट तयार हाेईल.

स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (फॉस्फो  कंपाेस्ट) वापराचे फायदे : 

स्फुरदयुक्त सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण वाढण्यास मदत हाेईल.

स्रोत- शेतकरी मासिक एप्रिल २०२३


No comments:

Post a Comment