पपई लागवड व्यवस्थापन व नियोजन
डॉ. उज्वल. ए. राऊत, डॉ. शशांक गो. भराड, डॉ. संतोष वि. घोलप,
फळशास्त्र विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला
पपई हे पीक उष्ण आणि समशीतोष्ण हवामानातील फळपीक असून वर्षभर या झाडापासून फळाचे उत्पादन मिळते. भारतामध्ये पोर्तुगिजांमार्फत फिलिपाईन्स येथून या फळाचा प्रवेश झाला. या फळपिकात अ, ब व क जीवनसत्त्वे उपलब्ध आहेत. पिकलेले फळ खाण्यासाठी तसेच कच्चे फळापासून पेपेन नावाचा पदार्थ महत्त्वाचा घटक असून त्याचा उपयोग औषधी, चॉकलेट इत्यादी करिता होतो. दक्षिण भारतात पेपेन जास्त प्रमाणात मिळणाऱ्या जाती लावून त्याचे उत्पादन घेतल्या जाते. तसेच जेली, जाम, मार्मालेड हे प्रक्रियायुक्त पदार्थ सुद्धा तयार करता येतात इतर ठिकाणी या झाडाची लागवड पिकलेल्या फळाकरिता जास्त प्रमाणात करण्यात येते.
पपईच्या खाण्यायोग्य १०० ग्रॅम गरामध्ये अन्नद्रव्य घटक व त्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आढळते.-
सोडियम ३ ते ४ मि.ग्रॅ. पोटॅशियम १२ ते १६ मि.ग्रॅ. लोह ०.२५ते 0.७५, कार्बोकायडेटस ६.९५ ग्रॅ., प्रोटिन्स ०.५ ते १.५ ग्रॅ., स्निग्ध पदार्थ 0.०८ ते ०.१ ग्रॅ., कॅल्शियम १२ ते ४१ मि.ग्रॅ. आस्कॉर्बिक आम्ल ४0० ते ७१ मि.ग्रॅ, पाणी ८९ ते ९० टक्के, लायसिन १५ ते १६ मि.ग्रॅ. फॉस्फरस ५ ते २२ मि.ग्रॅ. कॅरोटीन १५०० ते २००० आय. यू., थायमिन ०.४० मि.ग्रॅ. रिबोफलेव्हिन २५० मि.ग्रॅ. कॅलरीज २५ ते ४० मि.ग्रॅ.
हवामान :
पपई हे उष्ण कटिबंधातील पीक आहे. पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामानाची आवश्यकता असते. समशीतोष्ण कटिबंधात देखील पपईची झाडे चांगली वाढतात. जोरदार वारे आणि हिवाळ्यातील कडाक्याची थंडी, दव आणि धुके या पिकाला हानिकारक ठरतात. तापमान १० अंश सें.ग्रे. पेक्षा कमी असल्यास पपई फळे पक्व होण्याची क्रिया थांबते आणि काही प्रमाणात झाडाची वाढ व फळधारणा होण्यास अडचण निर्माण होते, तापमान ५ अंश सें.ग्रे. पेक्षा खाली गेल्यास पिकांवर प्रतिकूल परिणाम होतो. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंची पर्यंत उष्ण हवामानात पपईची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.
जमीन :
पपई लागवडीकरिता प्रामुख्याने जमिनीचा पोत हा एक महत्त्वाचा घटक आहे. पपईच्या लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य ठरते. पाणी साचल्यास मूळ, खोडसड रोग होतो. योग्य निचरा न होणाऱ्या, खारवट, खोल, काळ्या आणि सखोल भागातील जमिनीत पपईची लागवड करू नये. पपईच्या झाडांच्या मुळ्या उथळ आणि ठिसूळ असल्याने योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत त्या सडतात व त्यामुळे वाढ थांबते, उत्पादन घटते आणि काही वेळा झाडे मरतात.
सुधारित जाती :
पपईच्या जातीमध्ये प्रामुख्याने उभयलिंगी व द्रिभक्ती लिंगी जाती आढळून येतात. द्रिभक्त लिंगी जातीमध्ये
नर मादी फुल वेगवेगळ्या झाडावर असतात तर उभयलिंगी जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर
आढळून येतात.
१) पुसा डॉर्फ द्रिभक्तलिंगी
२) कोइमतूर- ४ द्रिभक्तलिंगी
३) कोइमतूर- ९ द्रिभक्तलिंगी
४) वॉशिंग्टन द्रिभक्तलिंगी
५) तैवान- ७८६
६) कुर्ग हनीड्यू (मधुबिंदु) उभगलिंगी
७) पुसा डेलिशिअस उभयलिंगी
८) कोइमतूर- ३ उभयलिंगी
९) कोइमतूर- ६ उभयलिंगी
यापैकी प्रामुख्याने उभयलिंगी जातीची लागवड फायदेशीर ठरते.
१) कुर्ग हनिड्यू (मधुबिंदू) :
ही जात उभयलिंगी प्रकारची असून झाडांची लागवड केल्यावर १०० टक्के फळे लागतात. चांगली उत्पादन क्षमता असून, एका झाडापासून ३० ते ४० फळे मिळतात. फळे लांब आकाराची असून गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे फळे चवीला अतिशय गोड असतात.
२) पुसा डेलिशिअस :
पपईची उभयलिंगी प्रकाराची जात असून झाडांची लागवड केल्यावर १०० टक्के फळे येतात. चांगली उत्पादन क्षमता, झाडाचे खोड मजबूत असून फळे जमिनीपासून १६० सें.मी. उंची पासून वर लागतात. फळातील गराला अतिशय चांगली चव, स्वाद आणि गोड गर, एका झाडापासून ३० ते ४० फळे प्रतिवर्षी मिळतात. सरासरी फळांचे वजन १ ते १.२ किलो असते. साखरेचे प्रमाण १० टक्के असते.
३) पुसा डॉर्फ :
द्रिभक्तलिंगी प्रकारची जात असून झाडे ठेंगणी आणि जास्त उत्पादने देणारी आहे. लागवडीनंतर झाडांना २३५ दिवसांचे अगोदर जमिनीपासून ४० सें.मी. उंचीपासून फळे लागतात. फळे मध्यम आकाराचे असतात. सरासरी फळांचे वजन १ ते १.५ किलो असते. फळातील गर अतिशय गोड असतो. गर मधुर व नारिंगी घट्ट असतो. या जातीमध्ये घन लागवड अतिशय चांगळी आहे तसेच सोसाट्याचा वारा जेथे वाहतो तेथे ही जात लागवडीकरिता फायदेशीर ठरते.
तामिळनाडू कृषि विद्यापीठ कोइमतूर यांनी प्रसारित केलेल्या जाती.
४) सी. ओ. ३ :
ही जात उभयलिंगी प्रकारची असून झाडे जोमदार वाढीची उंच असतात. फळे मध्यम आकाराची असून गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने गर गोड असतो. गराचा रंग लालसर असून ब्रिक्स १४.६ टक्के असते. सरासरी फळांचे वजन ०.५ ते 0.८ किलो असते एका झाडापासून दरवर्षी ९०0 ते १२० फळे मिळतात.
५) सी.ओ. २, सी.ओ. ४ , सी.ओ. ५, सी.ओ. ९, सी.ओ. ७:
या जाती पेपेन उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या आहेत त्यापैकी सी.ओ. ७ ही जात उभयलिंगी असून बाकीच्या द्रिभक््त लिंगी जाती आहे.
६) वॉशिग्टन :
ही जात द्रिभक््त लिंगी प्रकारची असून नर फुलांचे प्रमाण कमी असते. या झाडाच्या पानांचे देठ जांभळ्या खोडावर जांभळ्या रंगाचे ठिपके असून झाडे बुटकी असतात. फळे, लांब, वर्तुळाकार, फळांचे सरासरी वजन १.५ ते २.० किलो, गर केशरी, चवदार व उत्पादनास चांगली जात आहे.
७) तैवान : ७८५ आणि तैवान- ७८६ : सध्या महाराष्ट्रातील शेतकरी इतर जातीबरोबर तैवान-७८५ व तैवान-७८६ या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. लागवड व तोडणी जवळ जवळ वर्षभर चालू असते. या जातीच्या झाडांना १०० ते १२५ फळे लागतात. यापैकी ६० ते ७० फळे मोठ्या आकाराची व दुसऱ्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य असतात. फळांचे सरासरी वजन १ ते १.५ कि.ग्रॅ. पर्यंत व काही वेळेस २ कि.ग्रॅ. पर्यंत असते. फळांचे उत्पादन १००-१२५ मे.टन प्रती हेक्टर पर्यंत मिळते. शुद्ध बियाणे वापरल्यास या जाती व्हायरस रोगाला बळी पडत नाही. झाडांची उंची कमी असून हेक्टरी ४४४४ झाडांची लागवड करता येते. या जाती उभयलिंगी प्रकारच्या असतात.
अभिवृद्धी :
पपईची लागवड नेहमी बियांपासून रोपे तयार करून किंवा बिया कायमच्या जागी लावून करतात जातिवंत रोपे मिळविण्यासाठी बियाण्याची खरेदी अधिकृत सीड कंपनी किंवा खात्रीलायक ठिकाणावरून करावी. रोपे तयार करण्यासाठी १० सें.मी. > २० सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्या वापरणे योग्य असते. पाण्याच्या निचऱ्यासाठी पिशव्यांच्या तळाकडील भागाला छिद्रे पाडून घ्यावीत. चांगले कुजलेले शेणखत व तेवढीच चांगली माती एकत्र मिसळून पिशव्या भरून घ्याव्यात सुत्रकृमीचा त्रास होऊ नये म्हणून खत-माती मिश्रणामध्ये नीम केक पावडर मिसळून घ्यावी. किंवा कार्बोफ्युरॉन ३ ग्रॅ. प्रति पॉलिथिनच्या पिशवीतील मिश्रणात मिसळावे. बी पेरण्या अगोदर पिशव्यांतील माती मिश्रण पाण्याने ओले करून घ्यावे. वाफसा आल्यावर प्रत्येक पिशवीत जातीप्रमाणे १ ते २ बिया १ ते १.५ सें.मी. खोलीवर टोकून घ्यावे. जरुरीप्रमाणे पिशव्यांना नियमित पाणी द्यावे. बियांची उगवण १० ते १५ दिवसात होते.बियांची उगवण चांगली व लवकर होण्यासाठी बी जिब्रेलिक असिड १०० मि.ग्रॅ. १ लीटर पाण्यात मिसळून विरघळून तयार झालेल्या द्रावणात दोन तास बुडवून नंतर सावलीत वाळवून टोकावे. २०० ते २५० ग्रॅम बी एक हेक्टर लागवडीसाठी लागणाऱ्या रोपासाठी पुरेसे होते.
रोपे ५ ते १० सें.मी. उंचीची झाल्यावर बुरशीनाशक मिश्रण कॉपर ऑक्झिक्लोराईड २ ग्रॅम प्रति लीटर पाणी २५ मि.लि. प्रत्येक पिशवीत टाकावे बियांची उगवण होण्यासाठी तापमान अंदाजे ३५ अंश सें.ग्रे. पर्यंत असणे आवश्यक आहे. तापमान २३ अंश सें. ग्रे. खाली व ४४ अंश सेंग्रे. च्या वर असल्यास उगवणीवर परिणाम होतो. पिशवीतील रोपे ४५ ते ६० दिवसांची झाल्यावर मूळ ठिकाणी लावण्यास तयार होतात. पॉलिथिन पिशवी अलगद काढून मातीची हुंडी न फुटता रोपांची लागवड करावी.
पूर्वमशागत :
जमिनीची निवड झाल्यानंतर ती उभी-आडवी चांगली नांगरून घ्यावी. जमीन भुसभुशीत होण्यासाठी कुळवाच्या ३-४ पाळ्या द्याव्यात. त्यामुळे ढेकळं फुटून जमीन सपाट होईल. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवडीसाठी सर्वसाधारणपणे १.८ >: १.८ मी. अंतरावर ४५ > ४५ > ४५ सें.मी. आकारमानाचे खडडे उन्हाळ्यात खोदून समप्रमाणात मिश्रण तयार करून व या मिश्रणात फॉलिडॉल पावडर अंदाजे १०० ग्रॅम मिसळून खडडे भरून घ्यावेत. खडडे शेणखत-माती मिश्रणाने भरण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्याचे तळाशी ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो निमपावडर टाकावी. गादी वाफ्यावर ठिबक सिंचन वापर करून लागवड करावी.
पपईची लागवड-
वर्षातून तीन वेळा म्हणजे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यात करता येते.
पुनर्लागवड :
रोपांची उंची २२ ते २५ सें.मी. झाल्यानंतर ४० ते ६० दिवसांनी रोपांची लागवड करावी. रोपांची लागवड करण्यापूर्वी जमिनीला पाणी द्यावे. खडडे ओले करून घ्यावे. म्हणजे खत-माती मिश्रणाने भरलेले खड्डे स्थिर होऊन खाली बसतील, वाफसा आल्यानंतर लागवड सुरू करावी. दुपारी थोडे ऊन कमी झाल्यानंतर रोपांच्या लागवडीस सुरुवात करावी. रोपे तयार झालेल्या पिशव्यांचे तळ फोडून टाकून मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊन रोपे खड्ड्यात लावावे. रोपे लावताना मुळांभोवती पोकळी राहू न देता सभोवतालची माती घट्ट दाबावी.लागवडीनंतर हलके पाणी द्यावे. पावसाळ्यात लागवड केलेल्या रोपांना बुरशीनाशक औषध कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे तयार केलेले द्रावण प्रत्येक रोपाच्या भोवती २५० मि.लि. टाकावे.
नर-मादी रोपे : द्रिभक््त लिंगी प्रकारच्या जातींची लागवड करतेवेळी प्रत्येक खड्ड्यात एकमेकांपासून १० सें.मी. अंतरावर २-३ पिशवीतील रोपे लावावीत. कारण लागवड करताना नर व मादी रोपे ओळखता येत नाहीत. लावलेली रोपे ४-६ महिन्यांची झाल्यानंतर झाडांना फुले येण्यास सुरुवात होते.
नर झाडांना लांब दांड्यावर अनेक लहान लहान पांढरट पिवळी फुले येतात व मोठ्या झुपक्याने वाढतात. पानाच्या बगलेत एक अथवा तीन मोठ्या कळ्या आल्यास ते झाड मादीचे आहे असे समजावे. यावेळी नर
झाड ओळखून बुंध्यातूनच छाटून टाकावे. फक्त ५ ते ७ टक्के नर झाडे बागेच्या चारही दिशेने विखुरलेली राहतील या पद्धतीने ठेवावीत.
खत व्यवस्थापन :
पपई हे जलद वाढणारे, जास्त उत्पादन देणारे, त्याचबरोबर जास्त अन्नद्रव्ये शोषण करणारे फळझाड आहे. त्यामुळे पपईच्या झाडांना वर्षभर खताची उपलब्धता करावी लागते. झाडाच्या वाढीच्या काळात भरखताबरोबर वरखतांचे हपे द्यावेत. वर खतांच्या मात्रा दिल्यानंतर झाडाची वाढ, उत्पादनात वाढ दिसून येते.
लागवडीनंतर खताची मात्रा दर झाड (ग्रॅम)
महिना । नत्र । स्फुरद | पालाश | शेरा
पहिळा | ५० | ५० । ५० लागवडीनंतर खते देणे उपयुक्तठरते.
तिसरा | ५० । ५० | ५०
पाचवा ५० ५० ५०
सातवा ५० ५0 ५0
जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास ४ थ्या आणि ८ व्या महिन्यात झिंक सल्फेट ०.५ टक्के व बोरीक अँसिड ०.१ टक्का तीव्रतेची झाडावर फवारणी करावी. सदरचे द्रावण तयार करण्यासाठी झिंक सल्फेट ५ किलो आणि बोरीक अँसिड १ किलो १०० लीटर पाण्यात विरघळून तयार करावे.
फळांचा एकसारखा आकार, वजन व जास्त उत्पादन मिळविण्यासाठी पपई झाडांना ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याबरोबर खतांच्या मात्रा विद्राव्य खते वापरून द्याव्यात.
पपई झाडांना खतांच्या मात्रा ठिबक सिंचनानुसार खालीलप्रमाणे देण्यात याव्यात.
विद्राव्य खतांच्या मात्रा देण्याचे वेळापत्रक
१) विद्राव्य खतामधूनही प्रतिझाड २०० ग्रॅम नत्र, २०० ग्रॅम स्फुरद २०० ग्रॅम पालाश अशीच खतमात्रा महिन्यानुसार विभागून द्यावी. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी.
२) पहिल्या/ तिसऱ्या व पाचव्या व सातव्या महिन्यात प्रतिझाड दर १५ दिवसांनी १२५ ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची मात्रा द्यावी. आवश्यकता वाटल्यास हीच खतमात्रा विभागून आठ दिवसाच्या अंतराने ६३ ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणातही देता येते.
३) १ एकर क्षेत्रामध्ये जितकी झाडे बसतात त्यानुसार वरील मात्रेस गुणाकार करून प्रति एकरी प्रतिहप्ता द्यावयाची खतमात्रा काढता येते. खते देण्यापूर्वी जमिनीचे रासायनिक पृथ:करण करून अहवाल
उपलब्ध करावा म्हणजे खते देण्याच्या मात्रा निश्चित करता येतात. झाडांच्या पानामधील नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण समाधानकारक वाढीकरिता किती असावे हे निश्चित माहिती असण्याकरिता पक्व झालेल्या
पानांचे देठातील ऊती पृथ:करणासाठी वापरतात. देठामध्ये झाडांची समाधानकारक वाढ होण्यासाठी व उत्पादन जास्त प्रमाणात मिळण्यासाठी नत्र १.४४ टक्के, स्फुरद ०.२५ टक्के, आणि पालाश २.५२ टक्के असणे
आवश्यक आहे. देठातील उतीचे पृथ:करण प्रयोगशाळेत करून निश्चित खतांच्या मात्रांचे नियोजन करावे.
पाणी व्यवस्थापन :
५ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात. ठिबक सिंचनाचा उपयोग केल्यास ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होते. पपईच्या झाडांना पाणी देण्याची आवश्यकता असते. परंतु जमीन पाणथळ झाल्यास बुंधा सडण्याचा (कॉलर रॉट) रोग होतो. म्हणून उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांनी पाण्याची एक पाळी द्यावी आणि हिवाळ्यात ७ ते १० दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी.
आंतरमशागत आणि आंतरपिके :
पपईचे आळ्यात बुंध्याजवळ पाणीसाचू देऊ नये, किडी रोगांचे नियंत्रण करावे. पपईची मुळे उथळ असल्यामुळे आंतरमशागत आणि खुरपणी केवळ तण काढण्यापुरता मर्यादित असावी. पपईच्या ओळीतील रिकाम्या जागेत सुरुवातीला उथळ मुळ्यांची भाजीपाला पीक उदा. चवळी, वाटाणा, घेवडा, कांदा आणि मुळा किंवा कडधान्य उदा. हरभरा, वाटाणा, मूग आणी उडीद ही पिके घ्यावीत. वेलभाज्या, कोबीवर्गीय भाज्या, भेंडी, वांगी ही पिके पपईच्या जवळ लावू नयेत. आंतरपिकांना खताच्या वेगळ्या मात्रा द्याव्यात. फळधारणा व फुले विरळणी : पपई रोपांची लागवड केल्यापासून फळे तयार होईपर्यंतचा कालावधी १० ते १२ महिन्यांचा असतो. फुलधारणा होण्यास ५ महिने लागतात आणि आणखी ५-७ महिने फळे तोडण्यासाठी लागतात. एक वेळ फळधारणा सुरू झाल्यानंतर भरपूर फुले दिसून फळे लागतात. पुष्कळदा एकाच ठिकाणी जास्त फळे लागतात ही सर्व फळे झाडावर एकाच वेळी वाढू दिल्यास ती चांगली पोसत नाहीत. शिवाय फळांच्या दाटीमुळे आकार लहान व वेडावाकडा होतो. म्हणून सर्वच्या सर्व फळे वाढू न देता खूप दाटलेल्या फळातील काही फळे लहान असतानाच विरळणी करावी.
फळांची काढणी :
रोपे लागवडीपासून पाच महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते. लागवडीनंतर दहा-बारा महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात. पपईचे फळ काढणीस तयार झाले हे पुढील गुणधर्मावरून ओळखता येते.
१) पपई फळ काढणीसाठी तयार झाल्यावर त्यावर पिवळे डाग पडतात त्यास कवडी पडणे असे म्हणतात.
२) पपईच्या फळातून निघणारा चीक जेव्हा पाण्यासारखा पातळ निघतो तेव्हा फळ काढणीसाठी तयार झाले असे समजावे.
३) फळांच्या देठाजवळचा भाग पिवळा दिसू लागतो. फळांची तोडणी करताना फळे देठासहित तोडावी.
२ ते ३ वर्षापर्यंत पपईची फळे भरपूर मिळतात. त्यानंतर फळांचे उत्पादन कमी-कमी होत असल्याने व पानांचा आकारसुद्धा कमी होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फळांचे उत्पादन कमी झाल्यामुळे परवडत नाही. म्हणून झाडे काढून टाकावीत.स्थानिक बाजारासाठी फळे पूर्ण तयार झालेली काढावीत. फळे काढल्यानंतर त्यांच्या आकाराप्रमाणे प्रतवारी करून, स्वच्छ करून प्रत्येक फळावर कागद गुंडाळून टोपल्यात खालीवर गवताचा पेंडा भरून फळांचे पॅकिंग करावे. टोपलीचे झाकण लावून टोपल्या सुतळीने शिवाव्यात व शहरात विक्रीसाठी पाठवाव्यात. टोपल्यात आकारमानाप्रमाणे ४ ते १० फळे बसतात.
फळांची साठवण :
फळांची साठवण करण्यासाठी २० अंश सें.ग्रे. तापमान सर्वोत्कृष्ट अथवा अनुकूल असून फळे पिकण्याची क्रिया सुद्धा या तापमानात चांगली होते. यापेक्षा जास्त तापमानामध्ये फळांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.
उत्पादन :
पपईच्या बागेपासून वार्षिक उत्पन्न प्रति हेक्टरी ४० ते ६० मे.टन मिळू शकते. दुसऱ्या वर्षी २५ ते ३० मे.टन उत्पन्न मिळू शकते. तरीपण जाती, लागवड, मशागत, व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता, आंतरमशागत इत्यादी बाबीवर हेक्टरी उत्पादन अवलंबून असते. पपईच्या एका झाडापासून सरासरी ३० ते ७०0 फळे (४० ते ५० किलो प्रति झाड) एवढे उत्पादन मिळते.
शेतकरी मासिक फेब्रुवारी २०१९
संपर्क : ९८५०३१४३५२
No comments:
Post a Comment