chemical fertilizers

रासायनिक खते


 रासायनिक खताचे प्रकार :

खताचा प्रकार 





नत्रयुक्त खते

युरिया

अमोनियम सल्फेट




स्फुरदयुक्त खते

सुपर फॉस्फेट

डायकॅल्शियम फॉस्फेट




पालाशयुक्त खते

म्युरेट ऑफ पोटॅश

सल्फेट ऑफ पोटॅश




दुय्यम खते

चुना,

गंधक

मॅग्नेशियम



सूक्ष्म अन्नद्रव्ये

जस्त सल्फेट

मोरचूद

हिराकस

मँगनीज सल्फेट

बोरेक्स 

अमोनियम मॉलीब्डेट 



नैनो खते 

नैनो युरिया 

नैनो डीएपी 


इतर 


तक्ता क्र. ३ : रासायकनिक खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण (शेकडा)
अ.क्र.
खताचे नांव
नत्र
स्फुरद
पालाश
गंधक
)
नत्रयुक्त खते





१. अमोनियम सल्फेट
२०.६०
--
--
२४.००

२. अमोनियम क्लोराईड
२५.००
--
--
--

३. अमोनियम सल्फेट नाईट्रेट
२५.००
--
--
--

४. कॅल्शियम अमोनियम नाईट्रेट
२५.००
--
--
--

५. युरिया
४६.००
--
--
--
)
स्फुरदयुक्त खते





१. सिंगल सुपर फॉस्फेट
--
१६.००
--
१२.००

२. ट्रिपल सुपर फॉस्फेट
--
४८.००
--
१-१.५
क)
पालाशयुक्त खते





१. म्युरेट ऑफ पोटॅश
--
--
६०.००
--

२. सल्फेट ऑफ पोटॅश
--
--
४८.००
--
ड)
संयुक्त खते





१. डाय अमोनियम फॉस्फेट
१८
४६
--
--

२. नायट्रो फॉस्फेट (सुफला)
२०
२०
--
--

३. नायट्रो फॉस्फेट (उज्वला)
१५
१५
१५
--

उपरोक्त तक्त्यामध्ये दिलेल्या अन्नांशाच्या प्रमाणाच्या आधारे नत्र, स्फुरद अथवा पालाशयुक्त खताच्या द्यावयाच्या मात्रा काढता येतात (तक्ता क्र. ४).

तक्ता क्र. ४ : खताच्या मात्रा काढणे
अन्नद्रव्यांचे नांव
हव्या असलेल्या खताद्वारे पुरवठ्याची मात्रा
गुणकांक
नत्र
युरिया
२.१७
नत्र
अमोनियम सल्फेट
५.००
नत्र
अमोनियम क्लोराईड
४.००
नत्र
अमोनियम सल्फेट नायट्रेट
३.८४
स्फुरद
सिंगल सुपर फॉस्फेट
६.२५
पालाश
म्युरेट ऑफ पोटॅश
१.६७

उदा. समजा आपणास १०० किलो नत्र पिकाला द्यावयाचा आहे. युरिया आणि अमोनियम सल्फेटच्या स्वरुपात म्हणजे १०० २.१७ गुणकांक २१७ कि.ग्रॅ. युरिया किंवा १०० x  ५ ५०० कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट.
तक्ता क्र. ५ : सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारी खते आणि त्यांचे प्रमाण

खताचे नांव
अन्न्द्रव्याचे प्रमाण (%)
इतर अन्न्द्रव्यांचे प्रमाण (%)
जस्त सल्फेट
२२.५ (जस्त)
१५
फेरस सल्फेट
१९.० (लोह)
१९
मँगनीज सल्फेट
३०.५ (मँगनीज)
१७
तांबे सल्फेट
२४.० (तांबे)
१३
अमोनियम मॉलिब्डेट
५२.० (मोलाब्द)
--
बोरॅक्स (सोडियम टेट्राबोरॅट)
१०.५ (बोरॉन)
--
जिप्सम
--
२०

शिफारशी
1.  जमिनीत उपलब्ध जस्त कमी असल्यास १७.७५ कि.ग्रॅ. जस्त सल्फेट प्रति हेक्टरी ज्वारी – गहू अथवा साळ – हरभरा या पीक चक्रामध्ये जमिनीतून द्यावे.
2.  जमिनीत जलद्राव्य बोरॉनचे प्रमाण कमी असल्यास ५ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर बोरॅक्स कापसाच्या पिकास जमिनीतून द्यावे.
3.  चुनखडीयुक्त जमिनीत मसुरी रॉक फॉस्फेट आणि जीवाणूखत याचा वार साळ, भुईमूग या पीक चक्रामध्ये जमिनीतून करावा.
4.  भुईमूग पिकास हेक्टरी ५० किलोग्रॅम स्फुरदाची मात्रा बोरॉनयुक्त सुपर फॉस्फेट किंवा ५ किलो बोरॅक्स अधिक सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे जमिनीतून दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
5.  सूर्यफुल या पिकास हेक्टरी ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा बोरान युक्त सुपर फॉस्फेट किंवा ७.५ कि.ग्रॅ. बोरॅक्स अधिक ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे (उत्पादनात वाढ होण्यासाठी) जमिनीतून द्यावी.
6.  सर्वसाधारणपणे द्विदल पिके विशेषत: सोयबीन हे पीक सरी आणि वरंबा पद्धतीने घेतल्यास आणि स्फुरदाची जास्त मात्रा १२० कि.ग्रॅ. स्फुरद प्रति हेक्टरी तसेच शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा दिल्यास रबी ज्वारीमध्ये नत्र आणि स्फुरदाची कार्यक्षम वापर होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि उत्पादनात भरीव वाढ होते.
एकात्मिक पीक पोषण पध्‍दती
रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते आणि सेंद्रिय द्रव्ये यांचा योग्य प्रमाणात पूरक खते म्हणून वापर करण्याच्या पद्धतीस एकात्मिक पीक पोषण पद्धती असे म्हणतात.
      या पद्धतीत रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल साधला जातो. तसेच पिकांच्या फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करुन जमिनीची सुपिकता टिकविली जाते. या पद्धतीत पिकांच्या भरघोस उत्पादनाबरोबरच अन्नधान्य आणि जमिनीचा दर्जा सुधारला जातो. महागड्या रासायनिक खतांची बचत करुन जमिनीची उत्पादकता वर्षानुवर्षे सुधारली जाते. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे अन्नद्रव्याच्या एकूण गरजेपैकी अर्धी मात्रा रासायनिक खतामधून दिली जाते आणि उरलेली अर्धी मात्रा सेंद्रिय खतांमधून भागविली जाते. दर तीन वर्षातून एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेऊन जमिनीत गाडण्याची शिफारस केली आहे. पिकांचे सर्व अवशेष जसे ऊसाचे पाचट, ज्वारीची धसकटे, गहू व साळीचे बुडखे, सुर्यफुलाचे खोड आणि भुसा डाळवर्गीय पिकांचे सर्व अवशेष, इत्यादी जमिनीत गाडून सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविले जाते. या बरोबरच जिवाणू खते व गांडूळ खतांचा वापर करणे गरजेचे असते.

रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा.
1.  दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०)
2.  स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट
3.  डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट
4.  स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.
5.  नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).
6.  हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.
7.  साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा.

रासायनिक खते कशी द्यावीत
1.  साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.
2.  नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.
3.  चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.
4.  नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.

5.  पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

No comments:

Post a Comment