बायाेडायनॅमिक किडराेधक तरल खाद

 पिक सरक्षण : बायाेडायनॅमिक किडराेधक तरल खाद 


विविध पिकांच्या पीक संरक्षणासाठी स्पर्श आणि आंतरप्रवाही किटकनाशकांचा वापर केला जाताे. तसेच हे पिकावर चिकटून राहावे म्हणून स्टिकर  मिसळले जातात. पालेभाज्या हिरव्या चमकदार दिसाव्या यासाठी वेगवेगळी रसायने मिसळली जातात. असा बाधीत भाजीपाला, फळे ,अन्नधान्य खाण्यात आल्यामुळे  समाजात घातक आजार पसरत आहेत.


बायाेडायनॅमिक पद्धतीच्या पिक संरक्षणामधे काेणतेही रसायन वापरले जात नाही. गाैमुत्र, कडूनिंब पाला, बायाेडायनॅमिक सी.पी.पी. कल्चर, वनस्पती पाला, ऊर्जा वापरून किडराेधक तयार केले जाते. याचा वापर किडराेग येण्यापूर्वी प्रतिबंधक म्हणून करण्यात येतो.


आवश्यक साहित्य- 


1) 200 लिटर क्षमतेचा प्लास्टीक किंवा सिमेंटचा ड्रम 

2) बायाेडायनॅमिक  सी. पी.पी. कल्चर 1 किलाे (यामध्ये ट्रायकाेडर्मा बुरशी बिव्हेरीया आणि इतर मित्र जिवाणू असतात)

3) बायाेडायनॅमिक उर्जा वनस्पती पाला 200 ग्राम  (याङ्कधे फॉर्मिक अ‍ॅसीड पेस्ट रिपेलंट गुणधर्म असतात)

4) गाेमुत्र 10 लिटर (अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल व अ‍ॅन्टी फंगल गुणधर्म, गंधक, नत्र इ. असते)

5) गाईचे ताजे शेण 5 किलाे (जिवाणुचे खाद्य)

6) कडुनिंब पाला 5 किलाे (अँझाडीरॅक्टीन घटक किडराेधक गुणधर्म) 

7) रुई पाला- 2 किलाे चिरुन (बाेराॅनचा स्त्राेत आणि बुरशीराेधक गुणधर्म) 

8) सिताफळ पाला 2 किलाे (हॅड्राेसायनीक आम्लमुळे पेस्टरिपेलट) 

9) टनटनी पाला 2 किलाे (रस शाेषण करणाऱ्या  किडीपासून संरक्षणासाठी)

10) झेंडुचे संपूर्ण राेपटे: 2 किलाे चिरुन (सुत्रकृमी  नियंत्रणासाठी) 

11) सुबाभुळचा पाला 5 किलाे (नत्राचा स्त्राेत)


कृती :

ऊर्जा व्यतिरिक्त सर्व साहित्य ड्रम मध्ये  7 दिवस आंबवावे.

सर्व पाले पाण्यात बुडून राहण्यासाठी दरराेज बांबूने फिरवावे. 

सहाव्या दिवशी सकाळी ऊर्जा वनस्पती टाकावी.


वापर :

1) आदल्या दिवशी तयार किडराेधक कपड्याने किंवा प्लॅस्टिक चाळणीने गरजेनुसार गाळून घ्यावे. पिकावर फवारणीसाठी 1:20 प्रमाणे पाण्यासाेबत फवारणीस वापरावे.

2) सर्वसाधारण पिकासाठी दर अमावस्या- पाैर्णिमा फवारणी करावी.

3) भाजीपाला व फळपिकांवर प्रत्येक आठवड्याला फवारणी करावी.


विशेष किटराेधक तरलखाद :

विशेष किटराेधक तरलखाद तयार करण्यासाठी वरील साहित्यात 3 किलाे मासळीची साल किंवा संपूर्ण मासा तुकडे करुन आणि 2 किलाे हाडांचा चूरा फॉस्फेटटसाठी टाकावा. हे तयार हाेण्यास एक महिना कालावधी लागताे. ऊर्जा 30 व्या दिवशी टाकावे वापरण्याचे प्रमाण वरील प्रमाणे कमी  खर्चात तयार हाेते. काेणतेही रसायन नसते.


ड्रेंचिंगसाठी : 

गाळून घेतलेले 1 लिटर द्रावण 10 लिटर पाण्यात टाकून ड्रेंचींग  करावे. 

ठिबकने द्यावयाचे झाल्यास एकरी 20 लिटर सरळ व्हेंचुरीमधून द्यावे.


स्रोत-शेतकरी मासिक एप्रिल २०२३

No comments:

Post a Comment