Biodynamic 501-बायाेडायनॅमिक प्रिपरेशन- 501-बुरशीराेधक आणि पीकवर्धक

 बायाेडायनॅमिक प्रिपरेशन- 501-बुरशीराेधक आणि पीकवर्धक


बायाेडायनॅमिक प्रिपरेशन 501 हा बायाेडायनॅमिक पध्दतीने तयार झालेला सिलीका आहे. हे पिकांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ करण्यास मदत करते. तसेच पानाच्या काेशिकांची भिंत मजबूत करतात, ज्यामुळे भुरी, घुबडा, तांबेरा, यासारख्या बुरशीजन्य राेगांपासून संरक्षण हाेते. याच्या उपयाेगाने दाण्यांच्या आकारात व फळांच्या आकारात वाढ हाेते. फळे भाजीपाला यांत टिकावूपणा, ताजेपणा येताे व नैसर्गिक स्वाद मिळताे. ऊस आणि द्राक्ष यांसारख्या पिकांत साखरेच्या प्रमाणात वाढ दिसून येते आणि बाजारात विक्री किंमत चांगली मिळते. अवेळी हाेणारी फुलगळ व फळगळ थांबते. 


वापरण्याची पध्दत -


1) एक ग्रॅम  बायाेडायनॅमि क प्रिपरेशन 501 एक एकरासाठी एका वेळेस पुरेसे आहे.

2) एक ग्रॅम  प्रिपरेशन 501 हे एकामोठ्या बादलीत 13 लिटर शुद्ध पाण्यात मिसळून 1 तासापर्यंत काठीने उजवीकडून डावीकडे ढवळावे. ढवळतांना त्या द्रावणाचा भाेवरा तयार झाला पाहिजे म्हणजे मिश्रण याेग्य तयार हाेईल.

3) पीकांमध्ये प्रिपरेशन 501 ची फवारणी करतांना पंपाचे नाेजल आकाशाकडे उलटे करून बारिक (धुंद) फवारणी करावी

4) फवारणी पहाटे करावी व चंद्राच्या उत्तरायण स्थितीमध्ये करावी.

5) पहिली फवारणी पीक दाेन ते चार पानांचे असतांना व दुसरी फळ विकसित हाेण्याच्या वेळेस करावी.

6) बुरशीसारख्या राेगापासून संरक्षणासाठी प्रिपरेशन 501 चा फवारा शनि चंद्र समोरासमोर ज्या दिवशी येतील त्या दिवशी सूर्याेदयाचे वेळेस करावा.

7) प्रिपरेशन 501 ची फ वारणी वेगवेगळ्या पिकांवर बायाेडायनॅमिक पंचागात दिलेल्या लागवडीच्या तारखेस परंतु उत्तरायणमध्ये येणाऱ्या  तारखात फवारणी केली असता अतिशय फायदेशीर ठरते.

8) राेप जेव्हा 2-4 पानांचे हाेते तेव्हा त्यात रसाचे (sap) प्रमा ण जास्त असते. जास्त प्रमा णात नायट्राेजन दिल्यामुळेसुध्दा राेपात रसाचे प्रमाण जास्त वाढते. अशा अवस्थेत प्रिपरेशन 501 ची फ वारणी केल्यामुळे त्या जीवनरसाचा उपयाेग राेपाच्या वाढीसाठी कामात येताे ज्यामु ळे रसशाेषण  करणाऱ्या  किडींचे आक्रमण  कमी  हाेते.


फायदे  : 


1) पिकांना प्रकाश संश्लेषण क्रियेत मदत हाेते. 

2) कीड व राेग प्रतिकार शक्तीत वाढ हाेते.

3) बियाणे व फळांची गुणवत्ता वाढते व टिकाऊपणा वाढताे.


स्रोत- शेतकरी मासिक एप्रिल २०२३


No comments:

Post a Comment