बायाेडायनॅमिक प्रिपरेशन 500 भूमीसुधारक
रसायनांच्या अतिवापरामुळे मातीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या झपाट्याने कमी हाेत आहे. जीवाणू मातीची सुपीकता वाढवितात. मातीत नवचैतन्य निर्माण करतात. हे कमी झाल्याने अथवा नष्ट झाल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली. तसेच जमिनीत कडकपणा आला म्हणून अशा प्रकारच्या जमिनीत पिकांची मुळे नीटपणे पसरू न शकल्यामुळे त्यांना अन्नद्रव्य मिळणे दुरापास्त झाले. जमिनीची पाणी भरण्याची क्षमता कमी झाली आणि त्यामु ळे भूजलाची पातळी कमी झाली. बायाेडायनॅमीक प्रिपरेशन 500 चा उपयाेग केल्याने जमिनीत सूक्ष्म जीवाणूंची वाढ हाेते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, जमीन भुसभुसीत हाेते, जैविक क्रियेत वाढ हाेते. मातीची सच्छिद्रता वाढते व पिकांच्या मुळांच्या सर्वागीण विकासास मदत हाेते.
वापर कसा करावा ?
1) एक एकरासाठी 30 ग्रॅम पुरेसे.
2) एक 20 लिटर क्षमतेच्या प्लास्टीक बादलीत 13 लिटर शुध्द पाणी घेऊन त्यात 30 ग्रॅम बीडी प्रिपरेशन 500 मिसळून काठीने उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे एक तास ढवळावे ढवळतांना त्या द्रावणाचा भाेवरा तयार झाला पाहिजे.
3) पेरणी किंवा राेप लावणीच्या अगाेदरच्या दिवशी संध्याकाळी शक्यताे चंद्र दक्षिणायनमध्ये असताना अथवा लिंबाच्या डहाळ्याने जमि नीवर शिंपडावे.
4) फळझाडांचा खड्डा भरताना द्रावण शिंपडावे.
5) हे द्रावण पिकात दाेनदा शिंपडावे. पहिले पेरणीच्या वेळी आणि दुसऱ्या वेळी पीक 2 ते 4 पानाचे असतांना
फायदे:
1) जमिनीत ह्यूमसच्या प्रमाणात वाढ हाेते. जमिनीमध्ये कॅल्शियम चे संतुलन हाेते.
2) सूक्ष्म जीवाणूच्या संख्येत वाढ हाेते
3) जमीन भुसभुशीत हाेते.
4) गांडूळांच्या संख्येत वाढ हाेते.
5) जमि नीची जलधारण शक्ती वाढते परिणामी पाणी कमी लागते.
6) पिकांची मुळे जमिनीत खाेलवर गेल्यामुळे पिकास पूर्ण प्रमाणात अन्नद्रव्य प्राप्त हाेतात। परिणामी पिकांची वाढ जाेम दारपणे हाेते.
No comments:
Post a Comment