नॅडेप कंपाेस्ट खत
ही पद्धत नामदेव देवराव पंढरीपांडे पुसद जिल्हा यवतमाळ यांनी विकसीत केली आहे.
साहित्य
-
शेती काडीकचरा, पालापाचाेळा- 1400 ते 1500 किलाेग्रॅम
शेण-90 ते 100 किलाेग्रॅम
शेतातील बारीक गाळलेली माती -....1750 किलाे (120 टाेपली)
पाणी- 1500 ते 2000 लिटर
हाैद तयार करण्याची
कृती -
1. चांगला पाया भरुन
जमिनीवर पक्क्या विटांच्या सहाय्याने
3 मीटर टर लांब, 1.80 मीटर रुंद
व 0.90 मीटर उंच
(10 x 6 x 3 फूट )
अशा आकाराचे हाैद
बांधावा व हाैदाच्या
तळाचा भाग विटा
व दगड घालून
टणक बनवावा.
2. या नॅडेप हाैदात मोकळी हवा खेळती
रहावी याकरिता हाैद
बांधताना चारही बाजुच्या
भिंतीना छिद्र ठेवावी.
3. विटांच्या दाेन थरांची जुळणी झाल्यानंतर तिसऱ्या थराची जुळणी करतांना प्रत्येक वीट 17.5 सेमी (7 इंच) रिकामी जागा साेडुन जुळणी करावी म्हणजे चारही बाजूला 17.5 सेमी अंतराचे छिद्र तयार हाेऊन त्यातून मोकळी हवा खेळू शकेल. यामुळे काडीकचरा, पालापाचाेळा कुजण्याची क्रिया चांगली हाेते.
4. हाैदाच्या
भिंतीची जाडी 22.5 सेमी (9 इंच) असावी. विटांची
जुळवणी व बांधकाम मातीत करावे.
5. पहिल्या ओळीच्या दाेन छिद्राच्या मध्ये दुसऱ्या ओळीचे छिद्र व दुसऱ्या ओळीच्या छिद्रामध्ये तिसऱ्या ओळीचे छिद्र येईल. या पध्दतीने जुळणी करावी. अशा प्रकारे 3, 6 व 9 या थरामध्ये छिद्र तयार हाेईल. हाैदाच्या आतील व भुपष्ठाचा भाग शेण व मातीच्या मिश्रणाने लिंपून वाळल्यानंतर उपयाेगात आणावा.
पहिला
थर :
हाैदात सेंद्रिय काडीकचरा भरण्याचे
काम सुरु करण्यापूर्वी
टाक्याच्या आतील भिंती
व तळ शेण व पाणी
यांचा धाेळ करुन
ओल्या कराव्यात. काडीकचरा
व पालापाचाेळा, देठ, मुळे इत्यादी वनस्पतीजन्य
पदार्थाचा 15 सेमी चा
(6 इंच) थर टाकावा.
दुसरा थर :
125 लिटर पाणी व
4 किलाे शेण यांचे मिश्रण पहिल्या काडी-कचऱ्याच्या थरावर शिंपडावे
जेणेकरुन संपुर्ण वनस्पतीजन्य पदार्थ
ओले हाेतील.
तिसरा थर :
वाळलेली व गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या
50 टक्के (50 ते 60 किलाे)
याप्रमाणे शेण व
पाण्याच्या मिश्रणाने ओल्या केलेल्या
वनस्पतीजन्य पदार्थावर पसरावी. त्यावर
थाेडे पाणी शिंपडावे.
अशा पध्दतीने प्रत्येक
वेळी 3 थर देण्याच्या
पध्दतीचा अवलंब करुन
हाैदाच्या वर 45 सेमी (1.5 फुट) उंच थर
येतील याप्रमाणे हाैद
भरावे.
साधारणत: 11 ते 12 थरामध्ये हाैद भरले जाते. त्यावर 7.5 सेमी(3 इंच) मातीचा थर (400 ते 500 किलाे) टाकून त्यावर शेण व पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून टाकावे. वाळल्यानंर भेगा पडल्यास पुन्हा शेण व मातीच्या मिश्रणाने लेप द्यावा.
दुसरी भराई -
15 ते 20 दिवसानंतर
या हाैदात टाकलेले
सेंद्रिय पदार्थ आकुंचन
पाऊन साधारणत: 20 ते
22.5 सेमी (8 ते 9 इंच)
खाली दबलेली दिसून
येईल. तेव्हा पुन्हा
पहिल्या भराई प्रमाणेच
वनस्पतीजन्य पदार्थ शेण
व माती मीश्रण
आणि गाळलेल्या मातीच्या
थराची रचना करुन
टाक्याच्या वर 45 सेमी उंचीपर्यंत टाके भरुन
पुन्हा 7.5 सेमी (3 इंच) मातीचा थर देऊन शेण
व माती यांचे मिश्रणाने लिंपून बंद
करावे.
दक्षता :
कंपाेस्ट खताची गुणवत्ता
वाढविण्याकरिता गाईचे/जनावरांचे मुत्र जमा करुन
त्याचा ही उपयाेग
करावा.
या पध्दतीमध्ये हाैद भरल्यापासून
चांगले कंपाेस्ट खत
तयार हाेण्याकरिता 90 ते
120 दिवस लागतात.
तीन चार महिन्यात
खत परिपक्व हाेऊन
खताचा रंग भुरकट
व खताचा दुर्गंध
नाहीसा हाेताे. चाळणीमधून
गाळलेले खत जमिनीमध्ये पेरुन द्यावे.
या टाक्यातून साधारणत: 160 ते 175 घनङ्खुट चाळलेले खत व 40 ते 50 घनफुट कच्चा माल मिळताे. या संपुर्ण कालावधीत पडलेल्या भेगा शेण व पाण्याच्या मिश्रणाने बुजविणे व शिंपडणे चालू ठेवणे याबाबत दक्षता घ्यावी.
आर्द्रता कायम ठेवणे
याबाबत तसेच जास्त
ऊन असल्यास गवत
किंवा चटईने हाैद
झाकून ठेवावे.
कंपाेस्ट खत वापरण्याची
पध्दत - आपणाजवळ पुरेशा
प्रमाणात नॅडेप कंपाेस्ट
खत तयार असल्यास
दरवर्षी प्रती हेक्टर
7.5 ते 12.5 टन खत
पेरणीच्या 15 दिवस अगाेदर
पसरुन घ्यावे किंवा
खताची उपलब्धता कमी असल्यास पेरणीच्या वेळी
चाड्यामधून सुध्दा खत
पेरुन देता येते.
शेतकरी मासिक -एप्रिल २०२३


No comments:
Post a Comment